स्मशानात जाण्यासाठी रस्ता देता का रस्ता? केळी वासियांची शासनाला मागणी

स्मशानात जाण्यासाठी रस्ता देता का रस्ता? 
केळी वासियांची शासनाला मागणी 

वरोरा  हरीश केशवानी 
फक्त बातमी 

नागरी - माढेळीजवळील केळी या गावात  गावापासून ते नदी जवळच्या स्मशानात जाण्यासाठी पांदन रस्ताच नाही आहे . पावसाळ्यात या रस्त्यावर गुडघाभर चिखल असतो. या रस्त्यावरून चालणे म्हणजे तारेवरची कसरत,साधं पायी चालणे जिथं कठीण आहे त्या रस्त्यावरून  प्रेत कसं वाहुन नेणार..?असा संतप्त प्रश्न गावकरी करीत आहे. नदीकाठावर श्मशान भुमी असुनही पावसाळ्यात कुठेही जागा पाहुन अंत्यसंस्कार करावा लागतो या पेक्षा जास्त दुःखद काय असू शकते. प्राथमिक गरजा ही पूर्ण करीत नसेल तर प्रशासन कोणत्या कामाचा हा ही प्रश्न गावकरी करीत आहे.आतापर्यंत तिथे  800/900 मीटर रस्ता सुद्धा शासन करुन देवु शकत नाही आहे.
हा रस्ता नदी कडे, स्मशान भूमी कडे व तिथे शेती करीत असणारे सर्व शेतकरी ,गावातील गुरेढोरे चरण्यासाठी चा एकमेव मार्ग असुन शासनाकडे, लोकप्रतिनिधी कडे बरेचदा मागणी करुनही जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. ग्रा. पं केळी उखर्डा मार्फत,गावातील प्रतिष्ठीत नागरीका मार्फत ,प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींना भेटुन सुद्धा 10 वर्ष लोटूनही काहीही उपयोग होत नसेल तर अशी आश्वासने द्यायची कशाला? 
असा संतप्त सवाल गावकरी करत आहेत. 
येत्या 2 महीन्यात या श्मशानभुमी रस्त्या बाबत निर्णय झाला नाही तर येणार्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार गावकरी करीत आहेत. 
गावातील लोकांचा हा अतिशय गंभीर प्रश्न त्वरित सोडवावा अशी मागणी शासन व लोकप्रतिनिधी यांचेकडे राजुभाऊ झापर्डे व समस्त गावकरी करीत आहेत.

Comments