वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात इच्छुक उमेदवारची भाऊगर्दी

नेताजी लागले कामाला....

फक्त बातमी 
चेतन लुतडे वरोरा 

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत असून या विधानसभेमध्ये आपले नशीब अजमण्यासाठी बऱ्याच नेत्यांना चांगली संधी मिळणार आहे. काँग्रेस आमदार  प्रतिभाताई धानोरकर खासदार झाल्याने वरोरा विधानसभेची जागा रिक्त झाली यामुळे सदर विधानसभा क्षेत्रात आमदार बनण्याची शर्यत सुरू झाली. कुणबी समाजाचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडे बहुतांश इच्छुक उमेदवारांनी गर्दी सुरू केली आहे. तर भाजप पक्षाकडे उमेदवार कोण राहील याची चर्चा सुरू आहे. 



अंदाजे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार  प्रयत्न करीत आहेत.

भाजप पक्षातर्फे 1)रमेश राजूरकर,2) ऐहतेशाम अली 3) डॉक्टर सागर वझे, 4) किशोर टोंगे 5) विजय देवतळे 6) करण देवतळे  7)नरेंद्र जिवतोडे 8)अशोक जीवतोडे  9) राजू गायकवाड .
शिवसेना एकनाथ शिंदे गट10)नितीन मत्ते
राष्ट्रवादी अजित पवार गट. -11)विलास नेरकर
मनसे :-  12) राजू कुकडे .
---------------------------------------------------------------
काँग्रेस पक्षातर्फे
13)राजू चिकटे 14)प्रवीण काकडे, 15)डॉ. चेतन खूटेमाटे 16)दिनेश चोखारे 17)डॉक्टर हेमंत खापने 18)ॲड. पुरुषोत्तम सातपुते 19) विजय बद्दखल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट
20)रवींद्र शिंदे,21)मुकेश जीवतोडे 
22)अनिल धानोरकर 
राष्ट्रवादी 
23) शंभुनाथ वरघने 24) अमोल बावणे
बहुजन वंचित आघाडी 
25) भूपेंद्र रायपुरे, 
गोंडवाना गणतंत्र पार्टी
26)रमेश मेश्राम
अपक्ष
27)प्रवीण सुराणा, 28)किशोर डुकरे 

यांची नावे सध्या चांगलीच चर्चेत असून त्या व्यतिरिक्त वेळेवर अपक्ष उमेदवारांची संख्या वाढू शकते.


समीकरण:-
भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात जरी दिसत असली तरी अपक्ष किंवा वंचित आघाडीला तितकेच महत्त्व प्राप्त होताना दिसत आहे. 

१) अंदाजे काँग्रेसचे प्रवीण काकडे किंवा राजू चिकटे किंवा नवीन उमेदवार यापैकी एक उमेदवार झाल्यास भाजप पक्षाकडून रमेश राजूरकर किंवा नवीन उमेदवार येण्याची शक्यता आहे.

२) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रवींद्र शिंदे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात फार मोठा बदल घडवू शकतो त्यामुळे यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अपक्ष लढणार नाही अशी जरी भूमिका असली तरी वेळेवर कोणाला पाडायचे आहे त्यानुसार खेळी खेळल्या जाईल. किंवा ही जागा शेवटच्या क्षणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे. सर्वे मध्ये हे नाव  प्रथम पसंती क्रमांकावर असल्याचे चित्र दिसत आहे.

3)  यापैकी नाराज उमेदवार दुसऱ्या गटाला भेटून उमेदवारी घेऊ शकतो. 
४) अपक्ष उमेदवार जास्तीत जास्त लढल्यास निवडून येण्यासाठी अंदाजे 50 हजारापर्यंत मताधिक्य लागेल असा अंदाज वर्तवला जात आहे. 

5) शिवसेना एकनाथ शिंदे गटाला सीट दिल्यास नितीन मत्ते किंवा नवीन उमेदवार दावेदार असू शकतात.

शक्यतो वरिष्ठ नेत्यांनी तयार केलेल्या अर्थपूर्ण राजकारणात बल्लारपूर , वरोरा, ब्रह्मपुरी, असेच कनेक्शन दिसेल . एक उमेदवार  बलाढ्य तर दुसरा कमजोर दिसण्याची शक्यता आहे . सध्या जरी उमेदवार स्पष्ट दिसत नसेल तरी दोन्ही पक्षाकडून उमेदवार कोण असेल याचा अंदाज गटातील मातब्बर नेत्यांना लागला आहे. 




Comments