*_सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस श्री सुरेंद्र जी देठे व समीर देठे यांनी पिढीत शेतकऱ्याला भेट देऊन केले स्वातवन.*
*_सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस श्री सुरेंद्र जी देठे व समीर देठे यांनी पिढीत शेतकऱ्याला भेट देऊन केले स्वातवन.*
फक्त बातमी
चेतन लुतडे वरोरा
वरोरा तालुक्यातील पाचगाव येथील दोन शेतकऱ्यांच्या गोठ्याला ११ ऑगस्ट च्या मध्यरात्रीनंतररात्री लागलेल्या आगीत एक बैल ठार तर पाच बैल जखमी झाले. तसेच गुरांचा चारा व शेती उपयोगी वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या, या पिढीत शेतकऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र जी देठे व समीर देठे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतुन आर्थिक मदत करू अशी ग्वाही दिली.
वरोरा तालुक्यातील पाचगाव (ठाकरे) येथे रविवार दि.११ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर गोठ्याला आग लागून एका बैलाचा मृत्यू व पाच बैल जखमी, तसेच शेती उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना आज सोमवार दि.१३ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली. गोठ्यात पेटवलेल्या शेकोटी मुळे ही आग लागल्याचे म्हटले जाते. या आगीमुळे गोठ्यात बांधलेल्या वासुदेव सीताराम शेंडे यांचे बैल जखमी झाले. तर जनार्धन सीताराम शेंडे यांचा एक बैल मूत्यू झाला. तर दोन्ही शेतकऱ्यांची काही जनावरे जखमी झाली.
या आगीमध्ये जनावराचा चारा व शेती उपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाले. मृतक बैलाची किंमत अंदाज ५० हजार तर गुरांचा चाळीस हजार रुपयांचा चारा आणि ५० हजार रुपयांच्या शेती उपयोगी वस्तू या आगीच्या भक्षस्थानी पडले असल्याचे म्हटले जाते.
सदर घटनेची माहिती मिडताच तात्काळ सामाजिक कार्यकरते श्री. सुरेंद्रजी देठे, समीर देठे, सचिन भोयर, अनिकेत झिले, निखिल तिखट, मिलिंद भोयर, नीलकंठ आमटे, बाळकृष्ण जीवतोडे,नीलकंठ झाडे व पाचगाव या गावातील समस्त गावकरी उपस्तित होते..
Comments
Post a Comment