कोळसा वाहतूक ट्रकांमुळे जनसामान्यांचे जीवन विस्कळीत

कोळसा वाहतूक ट्रकांमुळे जनसामान्यांचे जीवन विस्कळीत 

वरोरा 4 aug 2024
चेतन लुतडे 

एकोणा कोळसाखदान सुरू झाल्यापासून वरोरा आणि लगतच्या गावामधील जनजीवन विस्कळीत झाले असून शासन निर्णयानुसार कामे होत नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

कोळसा खदानीतून निघालेले ट्रक वरोरा शहराच्या मध्यभागातून नेहमी जात असतात. यापूर्वीही भव्य आंदोलन केल्यामुळे रहदारी बंद करण्यात आली होती. यावर उपाययोजना म्हणून उपविभागीय कार्यालय वरोरा इथून लिखित आश्वासन देत हि रहदारी बंद करण्यात आली होती. व तात्पुरता बायपास रोड एमआयडीसी येथून देण्यात आला होता.  माढेळी नाका चौक व रत्नमाला चौक येथे या आदेशाचे फलक संबंधित विभागाकडून लावण्यात आले. परंतु या आदेशाला केराची  टोपली दाखवत काही दिवसातच ही वाहतूक पुन्हा पूर्वत सुरू झाली. मात्र यावेळेस प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी घेत कोळसा व्यापाऱ्यांनी आपला डाव साधत कोळसा वाहतूक राजरोसपणे सुरू केली. या ठिकाणावरून नेहमी  आरटीओ ची गाडी  फिरत असते मात्र यांचे पण दुर्लक्ष होत आहे. बऱ्याचदा कारवाईच्या नावावर ट्रक पकडून त्यावर तात्पुरता फाईन लाऊन सोडल्या जातो. आणि पुन्हा वाहतूक शहराच्या मध्यभागातून सुरू होते. हा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून असाच सुरू आहे.
त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त असून . रात्रीच्या वेळेस हे ट्रक मोठ्याने आवाज करीत रहदारी करत असल्याने सर्वसामान्य जनतेला झोपणे अवघड झाले आहे. घरांच्या भिंतीना भेगा पडल्या आहेत. रस्त्याची दुरावस्था झाली आहे. प्रदूषणाचे प्रमाण वाढले. येण्या जाण्यासाठी नागरिकांना अडचणी निर्माण झालेल्या आहे. बरेच निवेदन प्रशासनाला दिले आहेत मात्र आता क्रांती करावी लागेल असा इशाराही नागरिकांनी बोलून दाखवला.

त्यामुळे येत्या सात दिवसात प्रशासना ने ही वाहतूक बंद न केल्यास नागरिकांनी जन आंदोलन उभारण्याचा इशारा  वरिष्ठ प्रशासनाला दिला आहे.

Comments