*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष भगवा सप्ताह व प्राथमिक सभासद नोंदणीला वरोरा व राजुरा विधानसभेत सुरवात**वरोरा-भद्रावती विधासभा क्षेत्रात प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानास भरघोस प्रतिसाद*
*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष भगवा सप्ताह व प्राथमिक सभासद नोंदणीला वरोरा व राजुरा विधानसभेत सुरवात*
*वरोरा-भद्रावती विधासभा क्षेत्रात प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानास भरघोस प्रतिसाद*
वरोरा/भद्रावती :
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी व सर्व शिवसैनिक (सर्व विंग) च्या शिवसैनिकांच्या व्दारा पक्षप्रमुख आदरणीय उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशाने दि.*४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२४* पर्यत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ७५-वरोरा-भद्रावती तसेच ७०-राजुरा विधानसभा क्षेत्रातील पक्षाच्या कार्यालयातून भगवा सप्ताह व प्राथमिक सभासद नोंदणीला सुरवात करण्यात आली.
या सप्ताह मध्ये शिवसेना भवन मध्यवर्ती कार्यालय दादर मुबई वरुन प्राप्त सुचनानुसार पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव साहेब, पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, पुर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे, चंद्रपुर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांतदादा कदम, चंद्रपुर जिल्हा महीला आघाडी संपर्क प्रमुख सुषमाताई साबळे व पुर्व विदर्भ युवासेना सचिव तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, वरोरा विधानसभा सर्पकप्रमुख रितेश रहाटे, राजुरा विधानसभा सर्पकप्रमुख अनिल कदम यांचे मार्गदर्शनात भगव्या सप्ताह खालील प्रमाणे नियोजनबध्द कार्यक्रम राबविल्या जात आहे. यामध्ये प्रामुख्याने
• अतिवृष्टीमुळे शेतकरी यांचे अतोनात नुकसान झाले त्यासबंधाने शासन दरबारी नुकसान भरपाई मागणी सरकारकडे करणे.
• भगवा सप्ताहात "घर तेथे शिवसैनिक व गाव तेथे शिवसेनेची शाखा" ही संकल्पना राबविणे.
• विधानसभा क्षेत्रातील नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार असून प्राधान्यक्रमाने मतदार यादी तपासून त्यातील त्रुटी दुरुस्त कार्यक्रम देखील राबविणे.
• पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्याच्या जनतेला दोनदा दिलेली कर्ज माफी, शेती मालाला दिलेला भाव, विविध लोकहितार्थ राबविल्या गेलेल्या योजना व घेतलेले निर्णय, कोरोना काळातील महाभयंकर सकंटावर केलेली नियोजनबध्द मात याबाबत या सर्व लोकोपयोगी कार्यांला उजाळा देत जनते पर्यत पोहचवने.
• भगवा सप्ताहाच्या निमित्ताने घरोघरी जावुन शिवसैनिक व पदाधिकारी व्दारा जनतेसमोर वाचा फोडुन या ढोंगी सरकारचा फडदाफाश करुन जनतेची जनजागृती करणे.
• घटनाबाह्य सरकारकडुन राज्यात सुरु असलेली हुकुमशाही जाती पातीच्या नावावरील भेदभाव व आरक्षणाच्या नावाखाली जाती जाती मध्ये तेढ निर्माण करणे सुरु असुन याबाबत जनजागृती करणे.
• वरोरा-भद्रावती विधानसभा व राजुरा विधानसभेतुन क्षेत्रातून पहिल्या टप्यात किमान ५०,००० प्राथमिक सदस्य नोंदणी करने. या सर्व विविध उपक्रमावर दि.४ ॲागष्ट ते ११ ॲागष्ट पर्यत कार्यक्रम चालणार असुन शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षा तर्फ दैनदिन लोकहितार्थ जनसेवा, सामाजिक कार्य व पक्ष सघंटन सतत अवरिहीत सुरुच आहे.
75-वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील वरोरा मध्यवर्ती कार्यालय “शिवालय” व भद्रावती कार्यालय “शिवनेरी” येथून जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात प्राथमिक सदस्य नोदणी अभियानास सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी भद्रावती येथे तालुका प्रमुख नंदू पढाल, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख मायाताई नारळे, युवासेना जिल्हा अधिकारी रोहण कुटेमाटे, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना जिल्हा सरचिटणीस येशु आरगी, युवासेना तालुका अधिकारी राहुल मालेकर, उपतालुका प्रमुख गजानन उताणे, विठ्ठल हनवते, संघटक हरीदास शेंडे, माजरी पाटाळा संघटक कान्होबाजी तिखट, समन्वयक मनोहर आगलावे, भद्रावती शहर समन्वयक प्रशांत कारेकर, संघटक पंकज कातोरे, उपशहर प्रमुख राहुल बावणे, अरुण घुगुल, विजय पारधे, शाखा प्रमुख प्रफुल ताजणे, अनिल बोधाने, महिला विभागतर्फे जेष्ठ कार्यकर्त्या सुषमाताई शिंदे, तालुका संघटीका आशाताई ताजणे, शहर संघटीका मायाताई टेकाम, शहर समन्वयक भावनाताई खोब्रागडे, माजरी शहर महिला प्रमुख गायत्रीताई यमलावार, महिला शिवसैनिक प्रितीताई ताजणे, शिलाताई आगलावे, रजनीताई डंभारे, लताताई ठेंगणे, मालाताई दासगुप्ता, प्राजक्ताताई जुनघरे तथा माजी सैनिक बंडू वादेकर, राकेश पिंगे, विनोद डहाके, शिवसैनिक सुभाष चौधरी संतोष बांदुरकर, राहुल खोडे, रमेश जगताप, बाजार समिती संचालक मोहन भुक्या, तसेच आजी माजी, जेष्ठ व शिवसैनिक उपस्थित होते.
वरारो येथील अभियानास शहर प्रमुख खेमराज कुरेकार, तालुका संघटीका सरलाताई मालोकर, खांबाडा आबमक्ता जि.प.गट विभागीय समन्वयक प्रमोद वाघ, ओंकेश्वर टोंगे, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका कल्पनाताई टोंगे,, प्रिती पोहाणे, चरुरखटी सालोरी जि.प.गट उपतालुका प्रमुख अरुण महल्ले, टेमुर्डा प.स.गण विभाग प्रमुख गजानन गोवारदिपे, उपशहर प्रमुख अनिल सिंग, शशिकांत राम, खांबाडा विभाग विभाग प्रमुख अंकुश थाटे, विधानसभा युवाधिकारी अभिजीत कुडे, तालुका युवाअधिकारी विक्की तवाडे, फैजल शेख, पवन महाडीक, रोशन भोयर तसेच अनेक महिला व पुरूष पदाधिकारी तथा युवासेना पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
या सप्ताह मध्ये शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व विगंच्या पदाधिकारी, शिवसैनिक, शिक्षक सेना तसेच पक्षाचे सदस्य असलेले देशसेवेतील माजी सैनिक, विरपत्नी भगवा सप्ताह व प्राथमिक सदस्य नोंदणी कार्यक्रम राबवीत आहे व जनता सुध्दा यात हिरहीरीने भाग घेत आहे.
Comments
Post a Comment