महिला लाभार्थींनी मुख्यमंत्र्याबाबत व्यक्त केली कृतज्ञता**भाजप कार्यालयात केले रक्षाबंधन*

*महिला लाभार्थींनी मुख्यमंत्र्याबाबत व्यक्त केली कृतज्ञता*

*भाजप कार्यालयात केले रक्षाबंधन*

वरोडा - शाम ठेंगडी 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्याच्या  मुख्यमंत्र्यांनी  रक्षाबंधनानिमित्य बहिणींच्या खात्यात 3000 रूपये जमा केले.या बद्दल लाभार्थी बहिणींनी आज 20 आगस्ट रोज मंगलवार कार्यालयात रक्षाबंधन साजरा केला. 
        भाजपाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा संयोजक डॉक्टर सागर वझे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात ज्योति मोहितकर या लाभार्थी महिलेने रक्षाबंधन निमित्य मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या ओवाळणीबाबत आभार व्यक्त केले. 
      मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांची जीवनमान ऊंचाविण्यास सहाय्यभूत ठरेल अश्या भावना त्यानी व्यक्त केल्या.
        या योजनेतील जवळपास 150  लाभार्थीनींनी  डॉ. वझे यांना रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधल्या. या लाभार्थी मध्ये मुस्लिम महिलांचा सहभाग होता हे विशेष.
            यावेळी डॉ.सागर वझे यांनी या बहिणींना अल्पोपहार दिला. तसेच त्यांना रक्षाबंधनानिमित्त  भेटवस्तु दिल्या.याप्रसंगी डॉ सागर वझे यांनी बहिणीबाबत कृतज्ञता व्यक्त करत  त्यांना महत्वाचा सूचना दिल्या. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Comments