मामा मेलचा थरार! चंद्रपूर-मूल महामार्गावर भर दिवसा गायीची शिकार ओढत नेली, व्हिडीओ वायरल"

"मामा मेलचा थरार! चंद्रपूर-मूल महामार्गावर भर दिवसा गायीची शिकार ओढत नेली, व्हिडीओ वायरल" चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर-मूल महामार्गावर प्रसिद्ध 'मामा मेल' या वाघाच्या शिकारीचा थरार पाहायला मिळाला. भर दिवसा या वाघाने महामार्गावरून एका गायीची शिकार ओढत नेली. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी हा धक्कादायक प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. सध्या हे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहेत. 'मामा मेल' या वाघाचा अधिवास मूल-चंद्रपूर महामार्गावरील मामला परिसरात आहे. काल आगडी भागात महामार्गाच्या बाजूला त्याने गायीची शिकार केली आणि तिच्यावर ताव मारला. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी तेथे गर्दी केल्याने 'मामा मेल'ने आपली शिकार महामार्ग ओलांडून जंगलाच्या आत नेली. या थरारक शिकारीचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

*श्री अविनाश उके यांची वैद्यकीय मदत कक्ष चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती*

*श्री अविनाश उके यांची वैद्यकीय मदत कक्ष चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती*

वरोरा 
चेतन लुतडे 

 मुख्यमंत्री तथा मुख्य नेते शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांचे व डॉ . श्रीकांत शिंदे साहेब खासदार यांचे आदेशाने तथा डॉ मनिषाताई कायंदे पक्ष सचिव शिवसेना यांचे सम्मतीने, श्री किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ समन्वयक यांचे सूचनेनुसार व किशोरजी राय संपर्कप्रमुख चंद्रपूर जिल्हा यांचे मार्गदर्शनात, श्री राम हरी राऊत साहेब कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य वैद्यकीय मदत कक्ष यांनी  नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांचे सूचनेनुसार  अविनाश उके यांची वैद्यकीय मदत कक्ष चंद्रपूर जिल्हा (वरोरा - चंद्रपूर -बल्लारपूर विधानसभा क्षेत्र ) नियुक्ती करण्यात आली आज  नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी  अविनाश उके यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . 
यावेळी श्री कमलेश जी शुक्ला उपजिल्हाप्रमुख चंद्रपूर,  आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर, विलास परचाके विधानसभा समन्वयक वरोरा विधानसभा,  भूषण जी गुरले युवा सेना तथा उपसरपंच बोर्ड ग्रामपंचायत हे उपस्थित होते.

Comments