कान्सा ( शि. ) येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

*कान्सा ( शि. ) येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा* 
*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची  मुर्ती भेट*

भद्रावती 
चेतन लुतडे 

तालुक्यातील कान्सा ( शि. ) येथे दि. ३१ ऑगस्ट रोज शनिवारला ११ वा. वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने  ‘विदेही सद्गुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन उपक्रम’ या अंतर्गत कान्सा (शि.) येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची  मूर्ती भेट देण्यात आलेली आहे.
    यानिमित्त गुरुदेव सेवा मंडळ कान्सा ( शि. ) तथा  समस्त ग्रामस्थांच्या वतीने वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा  आयोजित  करण्यात आलेला आहे. दि ३० ऑगस्ट रोज शुक्रवारला सायंकाळी ६ वा. कवडू पा. भोयर, कान्साचे सरपंच मयूर टोंगे आणि पोलीस पाटील दीपक कुंभारे यांच्या शुभहस्ते घटस्थापना करण्यात येईल. सायं.७  वा. सामूहिक प्रार्थना आणि रात्रो ९ वा. गुरुदेव सेवा मंडळ कान्सा यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
     दि. ३१ ऑगस्ट रोज शनिवारला सकाळी ५ वा. ग्रामसफाई, ५.३० वा. सामुदायिक ध्यान, ७ वा. रामधुन, ११  वा. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडेल.
या कार्यक्रमाचे उद्घाटन स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक तथा शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे  जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे ( वरोरा व राजूरा विधानसभा क्षेत्र ) यांच्या शुभहस्ते करण्यात येईल. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुकुंज आश्रम मोझरीचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, कार्यक्रमाचे मार्गदर्शक  गुरुदेव सेवा मंडळ चंद्रपूरचे जिल्हा सेवाअधिकारी  रूपलाल कावळे, यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.धनराज आस्वले, शिवसेना तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, भटाळीचे सरपंच सरपंच सुधाकर रोहनकर, भद्रावती गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव झनक चौधरी, नंदोरीचे सरपंच मंगेश भोयर, कान्साचे सरपंच मयूर टोंगे, 
पानवडाळा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष गजानन उताणे, पोलीस  पाटील दीपक कुंभारे, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक बाळासाहेब पडवे आणि पिर्लीचे विष्णुदास मत्ते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी १२.३० वा. ह.भ.प. श्री.  विठ्ठल महाराज डाखरे ( नांदाफाटा ) यांच्या सुमधुर वाणीतून गोपाल  काल्याचे किर्तन सादर करण्यात येईल. सायंकाळी  ४ वा. महाप्रसाद आयोजित करण्यात आलेला आहे.

Comments