मामा मेलचा थरार! चंद्रपूर-मूल महामार्गावर भर दिवसा गायीची शिकार ओढत नेली, व्हिडीओ वायरल"

"मामा मेलचा थरार! चंद्रपूर-मूल महामार्गावर भर दिवसा गायीची शिकार ओढत नेली, व्हिडीओ वायरल" चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर-मूल महामार्गावर प्रसिद्ध 'मामा मेल' या वाघाच्या शिकारीचा थरार पाहायला मिळाला. भर दिवसा या वाघाने महामार्गावरून एका गायीची शिकार ओढत नेली. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी हा धक्कादायक प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. सध्या हे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहेत. 'मामा मेल' या वाघाचा अधिवास मूल-चंद्रपूर महामार्गावरील मामला परिसरात आहे. काल आगडी भागात महामार्गाच्या बाजूला त्याने गायीची शिकार केली आणि तिच्यावर ताव मारला. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी तेथे गर्दी केल्याने 'मामा मेल'ने आपली शिकार महामार्ग ओलांडून जंगलाच्या आत नेली. या थरारक शिकारीचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

डीएलएड प्रवेश प्रक्रिया विशेष फेरी 5 ऑगस्टपर्यंत*

*डीएलएड प्रवेश प्रक्रिया विशेष फेरी 5 ऑगस्टपर्यंत*

अकूंश अवथे चंद्रपूर 

*चंद्रपूर, दि. 1 :*  डीएलएड प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 च्या तीन प्रवेश फेऱ्या पूर्ण झालेल्या असून रिक्त जागेवरील प्रवेशाकरिता विशेष फेरी 1 ते 5 ऑगस्ट 2024  दरम्यान ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता सुरु होत आहे. बारावी उर्त्तीण  पात्र विद्यार्थ्यांनी पूर्वीप्रमाणेच www.maa.ac.in या संकेत स्थळावर जाऊन स्वत:चा अर्ज भरावा. अर्ज (approve) झाल्यानंतर स्वत:च्या लॉगीन मधून प्रवेश निश्चित करावा. यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज ऑनलाईन भरलेला आहे, परंतु प्रवेश घेतलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. अधिक माहितीकरिता  www.maa.ac.inया संकेत स्थळावर भेट द्यावी, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी कळविले आहे.
००००००

Comments