वरोरा येथे घरासमोरून दुचाकी चोरी; २० हजारांची होंडा पॅशन लंपास

वरोरा येथे घरासमोरून दुचाकी चोरी; २० हजारांची होंडा पॅशन लंपास बातमी: चेतन लूतडे  वरोरा : शहरातील सुभाष वॉर्ड परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुशर्रफ नैमुद्दीन सय्यद (वय 28) हे आपल्या कुटुंबासह सुभाष वॉर्ड येथे वास्तव्यास असून खाजगी व्यवसाय करतात. त्यांचे मामा मोहम्मद रिजवान ईब्राहीम शेख (रा. फैजनगर, यवतमाळ) यांच्या मालकीची काळ्या-लाल रंगाची होंडा पॅशन (क्र. MH 29 A 5854) ही मोटारसायकल सध्या मुशर्रफ सय्यद वापरत होते. दि. 23 एप्रिल 2026 रोजी त्यांनी सदर दुचाकी घरासमोर उभी करून सावंगी मेघे येथे गेले होते. दरम्यान सायंकाळी सुमारे 7.30 वाजेपर्यंत गाडी जागेवर होती, मात्र त्यानंतर अज्ञात चोरट्याने ती लंपास केल्याचे समोर आले. याबाबत कुटुंबीयांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र गाडी आढळून आली नाही. चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत अंदाजे 20 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरु...

*जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 23 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन* *विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षणार्थी नेमणूक**मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन*

*जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 23 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन* 

*विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षणार्थी नेमणूक*
*मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन* 

अकूंश अवथे चंद्रपूर 


चंद्रपूर, दि. 20 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय/ निमशासकीय आस्थापना, खाजगी / सार्वजनिक क्षेत्रातील उदयोग, सहकारी संस्था, सामाजिक संस्था, सेवा क्षेत्रांतर्गत खाजगी / सार्वजनिक आस्थापना/ कंपन्या/ उपक्रम / संस्था येथे प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्हयातील पात्र उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देण्याकरीता 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

त्यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार 1) 12 वी पास विद्यार्थांना प्रतिमाह विद्यावेतन  6 हजार रुपये, 2) आय टि आय / पदवीधर प्रतिमाह विद्यावेतन 8 हजार तर 3) पदवीधर / पदव्युत्तर विद्यार्थांना प्रतिमाह 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार  आहे.
करीता 12 वी पास, आय टी आय, कोणत्याही शाखेची पदवीका कोणत्याही शाखेचा पदविधर / पदव्युत्तर उमेदवारानी त्यांचे शैक्षणिक पात्रता सिध्द करणा-या मुळ प्रमाणपत्रासह वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

Comments