*चरूर, पारोधी गावात पुराचे पाणी शिरले**पोल्ट्री फार्म मधील कोंबड्या गेल्या वाहून*

*चरूर, पारोधी गावात पुराचे पाणी शिरले*

*पोल्ट्री फार्म मधील कोंबड्या गेल्या वाहून*

अतुल कोल्हे भद्रावती :-
               दिनांक १९ रोज शुक्रवारला पहाटे चार वाजता पासून सुरू झालेल्या  मुसळधार पावसामुळे तालुक्यातील चरूर व पारोधी गावात पूरस्थिती निर्माण झाली असून या दोन्ही गावातील अनेक भागात पुराचे पाणी शिरल्याने या दोन्ही गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चरूर गाव परिसरात असलेल्या एका पोल्ट्री फार्ममध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे या फार्म मधील जवळपास दोन हजार कोंबड्या वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पूर परिस्थितीची माहिती भद्रावती तहसील प्रशासनाला देण्यात आली आहे. आज पहाटे चार वाजता पासून या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.पावसाचा जोर इतका मोठा होता की अल्पावधीतच या दोन्ही गावा लगतच्या नाल्याला मोठा पूर आला. सदर पुराचे पाणी चरूर व पारोधी गावात शिरले.त्यामुळे ही दोन्ही गावे अर्धी अधिक जलमय झालेली आहेत. गावातील अंगणवाडी, शाळा तथा गावातील अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने या दोन्ही गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

Comments