आषाढी एकादशी निमित्त कीर्तन व पालखी सोहळा


आषाढी एकादशी निमित्त कीर्तन व पालखी सोहळा 
प्रतिनिधी 

वरोरा : येथील विठ्ठल मंदिर देवस्थान मध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी आषाढी एकादशी निमित्त गुरुवार दि. ११ ते  १८ जुलै दरम्यान हरिनाम सप्ताह , कीर्तन आणि पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
वरोरा येथील विठ्ठल मंदिर देवस्थान मध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी आषाढी एकादशीचे औचित्य साधून गुरुवार दि.११ जुलै ते १८ जुलै पर्यंत विविध धार्मिक ‌कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर हरिनाम सप्ताह दरम्यान गुरुवार दि.११ जुलै रोजी सकाळी सहा वाजता श्रींच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर नरेंद्र गोविंदराव डोंगरवार यांच्या हस्ते श्रींची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. ही पूजा सप्ताह दरम्यान दररोज सकाळी ६ वाजता होणार आहे. तसेच दररोज सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:३० या वेळेत श्री मोठे विठ्ठल मंदिर भजन मंडळ यांचे हस्ते भजन व आरती होणार आहे. शनिवार दि.१३ जुलै रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत ह. भ. प. मनू महाराज तुगनायत व संच वणी यांच्या संगीतमय सुंदर कांड पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. ११  ते १६ जुलै दरम्यान दुपारी दररोज तीन ते साडेपाच वाजेपर्यंत प्रो. राम काळे महाराज वर्धा यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. एकादशीला सदर कीर्तन रात्री८ ते १०:३० या वेळेत होणार आहे.
 दि.१७ जुलै रोजी एकादशीच्या पर्वावर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांची विठ्ठल-रुक्मिणी भेट सकाळी १०:३० वाजता घडवली जाणार आहे. गुरुवार दि.१८ जुलै रोजी दुपारी२:३० पालखी सोहळा व गोपाळकाला आयोजित करण्यात आला आहे. यात श्री चा प्राचीन रथ व माऊली आणि जगद्गुरूंची पालखी यांची भजनी दिंड्यांसह भव्य शोभायात्रा श्री मोठी विठ्ठल मंदिर देवस्थान मधून काढली जाणार असून ती मुख्य बाजारातील प्रमुख रस्त्यांवरून फिरवली जाणार आहे. तसेच शनिवार दि.२० जुलै रोजी दुपारी २ ते ५ वाजे दरम्यान मोठे श्री मोठे विठ्ठल मंदिर देवस्थान येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ भावक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Comments