टेमुर्डा ते जामणी डांबर रस्त्याची गुणवत्ता तपासावी.

टेमुर्डा ते जामणी डांबर रस्त्याची गुणवत्ता तपासावी. 

वरोरा 30/6/24
चेतन लुतडे 

 वरोरा तालुक्यातील टेंमूर्डा गावाजवळील महामार्गालगत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत  जामणी गावापर्यंत डांबर रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. हे काम पाहण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे व त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी गेले असता या रोड वरचे नवीन डांबरीकरण केलेले रस्त्यावरचे आवरण हाताने निघत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर या ठिकाणी वापरण्यात येणारे क्रश हे निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येणाऱ्या पहिल्याच पावसात हा रोड वाहून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाला या रस्त्याची पाहणी करून त्वरित ठेकेदाराचे पुढील पेमेंट थांबावे अशी मागणी किशोर डुकरे यांनी केली आहे. 

पावसाळ्यात हा रोड वाहून गेल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  संबंधित विभागाच्या इंजिनीयर व देखरेख करणारे कर्मचारी व ठेकेदार यांच्या खिशातून शासनाचे पैसे भरून द्यावे. अन्यथा आम्ही आंदोलन करू अशी भूमिका किशोर डुकरे यांनी घेतली आहे.
जामणी या गावपर्यंत रोड जाणार आहे. या संबंधात गावकरी सुद्धा आक्रमक झाले असून या रोडची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी अशी मागणी करत आहे.


Comments