भाजपा नेते किशोर टोंगे यांचा भद्रावती येथे स्नेहमिलन सोहळा संपन्नभाजप कार्यकर्ते, नेते, सामजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपा नेते किशोर टोंगे यांचा भद्रावती येथे स्नेहमिलन सोहळा संपन्न
भाजप कार्यकर्ते, नेते, सामजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  

फक्त बातमी 
चेतन लुतडे वरोरा 

भद्रावती:  दि. २८ जुलै २०२४ रोजी भारतीय जनता पार्टी चे युवा नेतृत्व किशोर टोंगे यांनी अनपेक्षितपणे भद्रावती तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे शहरी व ग्रामीण कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह युतीतील सहकारी पक्षाचे नेते व विविध सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र बोलवत स्नेहमिलन सोहळा घडवून आणला. या स्नेहमिलन कार्यक्रमाला भद्रावती शहरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामीण भागातील देखील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा कार्यक्रम पार पडल्याने शहरात व ग्रामीण भागात याविषयी मोठ्या प्रमाणत चर्चा होत आहे. 
 या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे  मनोगत झाले तर, स्नेहभोजनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या चर्चा घडून आल्या. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सर्वश्री विजय राऊत, नरेंद्र जिवतोडे, प्रवीण सातपुते, प्रवीण ठेंगणे, अमित गुंडावर,विजय वानखेडे, सिकंदर शेख, संजय वासेकर, सुनील नामोजवार, सौ. प्रणिता शेंडे शंकर रासेकर तर व इतर पक्षाचे प्रफुल चटकी, ज्ञानेश्वर डुकरे, गावंडे, इ. पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी किशोर टोंगे हे सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या कार्याबद्दल आपल्या मनोगतात कौतुक केले. 
पुढील दोन महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने किशोर टोंगे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही सर्व तन मन धनाने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ राहू असेही अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पक्ष ज्या उमेदवाराला तिकीट देईल त्याच्या पाठीशी आपण भक्कमपणे सर्वजन एकत्र उभे राहू असा सूर या कार्यक्रमात होता.
विविध क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, महिला यांनी देखील या कार्यक्रमात आपली उपस्थिती लावत किशोर टोंगे यांच्यासारखे दूरदृष्टी आणि विकासाची जाण असलेले नेतृत्व पुढे आले पाहिजे आम्ही सर्वजन पाठीशी राहू असे मत व्यक्त केले.
यावेळी किशोर टोंगे यांच्याशी बोललो असता ते म्हणाले की, ही विधानसभेची मोर्चेबांधणी नसून आपल्या माणसांनी एकत्र यावं, सगळ्यांची विचारपूस व्हावी, विचारांचं आदानप्रदान व्हावे आणि सर्वांना एकत्र स्नेहभोजन घडावे, या सर्व अनुभवी पदाधीकाऱ्याकडून आम्हाला नवीन काही शिकता याव या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
या कार्यक्रमात  महायुतीतील भारतीय जनता, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच इतर आम आदमी पक्ष, मनसे, वंचित बहुजन आघाडी इ. पक्षाचे सर्व पदाधिकारी देखील सहभागी होते. त्यामुळे पक्ष उमेदवारी देईल त्याच उमेदवारच काम सगळे नेते करणार आहेत. याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही अस ते म्हणाले. तसेच भाजप पदाधिकाऱ्यासोबतच इतरही पक्षातील मंडळी प्रेमापोटी उपस्थित राहीली याबद्दल त्यांचे आभार मानले.

Comments