अतुल कोल्हे भद्रावती -
आषाढ पौर्णिमा ते आश्विन पूर्णिमा नवे पवित्र वर्षावास धम्मपर व कार्यक्रम दिनांक २१ जुलै ते १७ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत ऐतिहासिक विजासन बुद्ध लेणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात पार पडणार आहे या वर्षावास कार्यक्रमाकरिता वंदनीय भदंत धम्मप्रकाश संबोधी यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे . दिनांक २१ जुलै पासून सुरुवात होणाऱ्या या वर्षावास कार्यक्रमात धम्म रॅली , भिक्खु संघाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन सुत्त पठण, धम्म देसना तसेच दररोज सकाळी साडेपाच वाजता ध्यान साधना व बुद्ध वंदना व सायंकाळी सहा वाजता बुद्ध वंदना व धम्म देसना कार्यक्रम घेण्यात येणार आहे. वर्षावास कालावधीत भिक्खुला भोजनदान, चिवरदान, कठीण चिंवरदान, परिश्रम पाठ इतर कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या उपासकांनी भंते किंवा समितीशी संपर्क साधण्याचे आव्हान वर्षावास आयोजन समिती भद्रावतीचे अध्यक्ष लिनता जुनगरे, सचिव छाया कांबळे, कोषाध्यक्ष शिला खाडे,शालिनी गोरघाटे, विनयबोदी डोंगरे, जयदेव खाडे, सुरज गावंडे, प्रियवंद वाघमारे यांनी हे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment