लघु पाटबंधारे विभाग भटाळा तलाव फुटण्याच्या मार्गांवर संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज

लघु पाटबंधारे विभाग भटाळा तलाव फुटण्याच्या मार्गांवर 

संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज 

वरोरा
चेतन लुतडे 

 वरोरा तालुक्यातील लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर शाखा वरोरा यांच्यावतीने कोटबाळा भटाळा, खेमजई या तिन्ही गावच्या मधोमध लघु पाटबंधारे विभाग भटाळा नावाने  40 वर्षा अगोदर तलाव बांधण्यात आले आहे.
 या तलावाची अजून पर्यंत कुठलीच दुरुस्ती करण्यात आली नसल्याने  तलावाचे बांधकाम पूर्णपणे जीर्ण झाले आहे.
 सततच्या पावसामुळे या ठिकाणी भोगदा पडला असून बराच पाण्याचा विसर्ग यामधून होत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास लवकरच जीर्ण झालेली जमिन फुटण्याच्या मार्गावर आहे, या तलावात गेट नसून, फॉल आहे फॉलची भिंत कोसळली असून  संबंधित अधिकारी यांनी या तलावाची पाहणी करून डाकडुजी करण्याचा प्रयत्न करत आहे,
 

लघु पाटबंधारे विभाग यांनी तयार केलेल्या तलाव दुरुस्ती साठी ग्रामपंचायत भटाळा तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून वारंवार तक्रारी दिल्या मात्र अधिकारी उदासीन असल्यामुळे आज शेतकरी यांना मोठा फटका बसण्याची वेळ आली आहे,तसेच तलाव फुटल्यास शेतपिकाची झालेली नुस्कान भरपाई सिंचन विभागाने दयावी आणि तलावाच्या पाण्याखाली येणाऱ्या रब्बी पीक सिंचाई शेतकरी यांना कामचुकार अधिकारी यांच्या वेतानातून देणात यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे . कोटबाळा, भटाळा, आसाळा, बोरगाव देश या गावातील शेतकरी यांना मोठा फटका बसेल अशी सामाजिक कार्यकर्ते श्री किशोर  डुकरे यांनी वर्तवली आहे.

Comments