*सराफा असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेश कोठारी तर सचिवपदी प्रशांत येजनुरवार**सराफा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेश लोढा यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न*
*सराफा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेश लोढा यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न*
अतुल कोल्हे भद्रावती :
स्थानीय भद्रावती सराफा असोसिएशन द्वारा श्री कोठारी ज्वेलर्स येथे जिल्हा सराफा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेश लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि.२३ जुलैला पार पडलेल्या एका बैठकीत भद्रावती सराफा असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेश कोठारी यांची तर सचिवपदी प्रशांत येजनुरवार यांची अविरोध एकमताने निवड करण्यात आली.
त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून प्रसणा कोचर,दिवाकर नागपुरे,कोषाध्यक्ष अनंता रोकमवार यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी पूर्व जिल्हा सचिव आशुजी सागोळे,पूर्व जिल्हा कोषाध्यक्ष मितेश लोडिया, व चंद्रपूर शहर उपाध्यक्ष गोविंद सोनी प्रामुख्याने उपस्थित होते. त्या सर्वांनी पुष्गुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.त्यांच्या या निवडीने सराफा क्षेत्रात अभिनंदन केल्या जात आहे.
Comments
Post a Comment