गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गजानन नगरातील बगिच्याचे लोकार्पण; नागरिकांना मिळाली स्वच्छ व सुरक्षित जागा.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गजानन नगरातील बगिच्याचे लोकार्पण; नागरिकांना मिळाली स्वच्छ व सुरक्षित जागा. वरोरा:22/3/26 शहरातील ओपन स्पेसमध्ये साफसफाई आणि लाइटिंगच्या सुविधांअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, नवनियुक्त नगरसेवक बंडू देऊळकर यांच्या प्रयत्नातून वार्डातील साफसफाईला सुरुवात झाली असून ओपन स्पेस विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे. याचाच एक भाग म्हणून गजानन नगर येथील ओपन स्पेस मध्ये आमदार व नगरपालिकेच्या सहकार्यातून  सर्वांगीण साफसफाई करून नवीन लाइट सिस्टीम बसविण्यात आली होती.  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नगराध्यक्षा अर्चना आशिष ठाकरे यांच्या हस्ते या बगिच्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत नगरसेवक बंडूभाऊ देऊळकर, अनिलभाऊ झोटिंग, राहुल देवडे, अनिल पाटील सर, गौरकर सर, गोखरे सर, गठ्ठना मामा, धोटे सर, बुरीले सर, चौधरी सर, डॉ. हटवार साहेब, सौ. हटवार, संगीत नवघरे, सौ. नवघरे मॅडम यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते. नवनियुक्त नगरसेवक बंडू देऊळकर यांच्या प्रयत्नांतून वार्डातील साफसफाई व विकासाची कामे सुरू असून ओपन ...

*युवकाची गळफास घेऊन आत्महत्या*

*युवकाची गळफास घेऊन आत्महत्या*

*भद्रावती शहरातील बुद्ध लेणी विजासन येथील घटना*
अतुल कोल्हे भद्रावती - 
               शहरातील विजासन येथे राहणाऱ्या युवकांनी छताला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारला दि. ११ जुलै ला उघडकीस आली. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
सुभाष माधव बावणे वय ३२ वर्ष राहणार बुद्ध लेणी विजासन असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याची पत्नी व मुले त्याच्याजवळ दोन वर्षापासून राहत नसल्याने तो दारूच्या आहारी गेला होता याच विवचनेने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. घरीकोणी नसताना छताला दोर बांधून गळ्फास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

जाहिरात

Comments