वरोरा
चेतन लुतडे
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत स्वच्छता पंधरवाडा निमित्य भारत सरकारचे निर्देशानुसार भारत पेट्रोलियम कंपनी कडून आनंदवनातील संस्कार सदन मध्ये विद्यार्थ्यांसाठी 11जुलै 2024 ला चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी भारत पेट्रोलियम नागपूर चे सेल्समन अधिकारी सन्माननीय भूपेंद्र देवांगन,सन्माननीय मनोज भगत सी आर इ, बी पी सी एल, सन्माननीय देवानंद महाजन भारत पेट्रोलियम संचालक माढेळी, कलाशिक्षक प्रल्हाद ठक, संधीनिकेतन अपंगाची कर्मशाळा अधीक्षक रवी नलगिन्टवार, राजेश ताजने, सारिका सौसागडे मुख्याध्यापक भसारकर सर,आदींची उपस्थिती होती.
आनंदवनातील आनंद मूकबधिर शाळा, संधी निकेतन अपंगाची कर्मशाळा, आणि आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन ह्या चारही शाळेचे 71 विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले होते.मा. भूपेंद्र देवांगन, मनोज भगत, देवानंद महाजन, रवी नलगिन्टवार, सारिका सौसागडे,यांनी मार्गदर्शन केले. चित्रकला स्पर्धा यशस्वीतेसाठी विक्रम पटेल सर, ताटे सर, जवळे सर, कलाशिक्षक ठक सर,कोहपरे सर आदींनी सहकार्य केले.स्पर्धेचे परीक्षक म्हणुन मा. प्रल्हाद ठक यांनी काम पाहिले. विजेता विद्यार्थ्यांना मोमेंटो आणि प्रमाणपत्र मान्यवरांचे हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मा. गुलाब गुलक्षे सरांनी तर आभार प्रदर्शन विक्रम पटेल सरांनी केले.
Comments
Post a Comment