*"दप्तरविना शनिवार" या उपक्रमा अंतर्गत शालेय मंत्रिमंडळाची प्रत्यक्ष निवडणूक**चंदनखेडा जि. प. शाळेचा स्तुत्य उपक्रम*

*"दप्तरविना शनिवार" या उपक्रमा अंतर्गत शालेय मंत्रिमंडळाची प्रत्यक्ष निवडणूक*

*चंदनखेडा जि. प. शाळेचा स्तुत्य उपक्रम*

अतुल कोल्हे भद्रावती :-
जाहिरात
            तालुक्यातील जि. प. उच्च प्रा. शाळा चदनखेडा येथे "दप्तरविना शनिवार" या उपक्रमा अंतर्गत शालेय मंत्रिमंडळ निवडणुक २०२४, शाळेचे विषय शिक्षक श्री.पंडीत लोंढे यांचे संकल्पनेतून "प्रत्यक्ष मतदान" घेण्यात आले, कार्यवाहीच्या प्रत्येक टप्यातून मतदान प्रात्यक्षिकपणे घेण्यात आले. या प्रक्रियेत मतदार-वर्ग ३ते ७ वर्गाचे विद्यार्थी मतदार होते.एकूण ८ उमेदवार निवडणुकीस उभे राहिले.जे उमेदवार फार्म भरुन विद्यार्थ्यांद्वारे सुचक अनुमोदनाने स्विकारले.एकूण मतदार १७८.(वर्ग४ते ७) 

   *मतदान पथक-*  निवडणूक मतदान केंद्राध्यक्ष म्हणुन मा.अरविंद मेश्राम सर, क्र.१चे अधिकारी मा.सुखदेव मेश्राम,क्र.२चे अधिकारी मा.प्रतिभा गुंडमवार,,क्र ३चे अधिकारी म्हणून कु.अर्चना धकाते.इत्या.अधिकारी कर्मचारी यांनी भुमीका पार पाडल्या तर मा.सुभाष कुंभारे सर पोलीस शिपाई म्हणुन काम पाहिले.
 *पत्रकार -*  वर्ग सहावीतील रोहन मुडेवार पत्रकार तर कँमेरामन - उत्कर्ष कोकुडे यांनी जबाबदारी सांभाळली. अनेकांच्या मुलाखती घेऊन फार रंगत आणली. त्याने उमेदवार, मतदार, मतदान अधिकारी कर्मचारी यांच्या स्वयंप्रेरित होऊन खूप सुंदर मुलाखती घेतल्या,एक दिग्गज पत्रकाराला लाजवेल अशि त्याची शैली खरच कौतुकास्पद होती.
  
 *बुथ तयारी-* मतदान कक्ष.  बुथची रचना, निवडणूक निरिक्षक,पोलीस शिपाई, झोनल,निवडणूक निरिक्षक यासह रचना करुन प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया आटोपली.मतपेटी सिलबंद केली.

 *प्रत्यक्ष मतदान-* एकूण मतदार १७८.(वर्ग४ते ७) झालेले मतदान १७८ (१००%)
मतदान कक्षात काम करणा-या अधिकारी कर्मचारी यांचे समोर वर्गवार विद्यार्थ्यांनी रांगेत येऊन ओळखपत्र दाखवून मतदान पत्रिका वाटप,बोटाला शाई लावून मतदान कक्षात मतदान नोंदवून,मतपत्रिकेची घडी करुन मतपेटीत मतपत्रीका टाकण्यात येत होत्या.

 *मतमोजणी-*  काही  वेळानंतर मतदान मोजणी यंत्रणा उभी करुन प्रत्यक्ष मतदान पत्रिका विभागणी, मतमोजणी,आणि निकाल घोषीत झाला.त्या मतमोजणी कर्मचारी म्हणून अस्मिता मुडेवार,श्रावस्ती भागवत,प्रिया भोयर या विद्यार्थ्यांनी मतमोजणी यंत्रणेत कर्मचारी म्हणून काम पाहिले. 
*निवडणूक निकाल घोषणा व  स्वागत-*  मा.अनिता आईंचवार मु.अ.यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री मनिष झिंगरे व उपमुख्यमंत्री कु.पुर्वी कोकुडे  यांचे स्वागत व अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांनी निवडणुकीच्या प्रत्यक्ष अनुभव व ज्ञानासह आनंद घेतला. या वेळी सर्वांचे आभार उमेश कोकुडे याने मानले.

Comments