स्पर्धेच्या माध्यमातुन होणार ३ हजार वृक्षांची लागवड आम्ही वृक्षप्रेमी स्पर्धेत ४७ गट सहभागी

स्पर्धेच्या माध्यमातुन होणार ३ हजार वृक्षांची लागवड 
आम्ही वृक्षप्रेमी स्पर्धेत ४७ गट सहभागी

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर ०५ जुलै - चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १ जुलै ते १५ जुलै दरम्यान घेतल्या जाणाऱ्या आम्ही वृक्षप्रेमी स्पर्धेत ४६ गट सहभागी झाले असुन स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेत शहरातील प्रत्येक उपलब्ध मोकळ्या जागेत ३ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे.  
     या स्पर्धेत स्थानिक सामाजिक संस्था, एन.जी.ओ, ओपन स्पेस विकास समिती, विविध क्लब, जेष्ठ नागरिक मंडळे, युवक-युवती मंडळे, तसेच महिला मंडळे यांनी सहभाग घेतला असुन वृक्षारोपण करून त्या वृक्षाचे संगोपन करणाऱ्या गटांना मनपातर्फे रोख पारितोषिक देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. सदर स्पर्धा अधिकृत सामाजिक संस्था / नोंदणीकृत क्लब व नागरिकांसाठी खुला गट अश्या २ गटात घेतली जात असुन स्वयंसेवी संस्थांचे १४ गट तर नागरिकांचे ३३ गट असे एकुण ४७ गट सहभागी झाले आहेत. या गटांनी वृक्ष लागवडीचे ठराविक ध्येय निश्चित केले असुन सर्व गट मिळुन ३ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. 
   
    वृक्षांच्या कमी होत असलेल्या संख्येने तापमान वाढीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तापमान वाढीची परिस्थिती सुधारण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हिरवेगार आच्छादन वाढवणे आणि झाडे लावून निसर्गाचे सौंदर्य परत आणणे. वृक्षारोपण मोहीम हा हवामान बदलावर सकारात्मक प्रभाव पाडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याने शहरातील प्रत्येक घरी,रस्त्याकडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागांमध्ये वृक्ष लागवड मोहीम मनपातर्फे राबविण्यात येत आहे.

Comments