खाजगी शाळांच्या 'नफेखोरी'विरोधात कडक कायदा करा; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

खाजगी शाळांच्या 'नफेखोरी'विरोधात कडक कायदा करा; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन चंद्रपूर, दिनांक ११/३/२०२६: राज्यातील खाजगी शाळांकडून पालकांची होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. शाळांच्या आवारातच पुस्तके, वह्या व गणवेश यांच्या विक्रीतून सुरू असलेल्या नफेखोरीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने कडक कायदा करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी केली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेनेच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. वरोरा येथील सेंट ॲन्स पब्लिक स्कूलवर अलीकडेच कारवाई करण्यात आले होती.  राज्यातील बहुतांश खाजगी शाळांनी शिक्षणाचा पवित्र व्यवसाय बाजूला ठेवून व्यावसायिक नफेखोरीचा मार्ग अवलंबला आहे. शाळेच्या आवारातच पुस्तके, वह्या आणि गणवेशाची विक्री सक्तीची केली जाते. विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्याची सक्ती पालकांना केली जात असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत: · प...

पूर्वेश वांढरे प्रकरणातील तोडगा न निघाल्याने आंदोलकानी रस्ता अडविला.वैभव डहाणे अजूनही तहसीलच्या टॉवर वरच

पूर्वेश वांढरे प्रकरणातील तोडगा न निघाल्याने आंदोलकानी रस्ता अडविला.

वैभव डहाणे अजूनही तहसीलच्या टॉवर वरच 

शिष्टमंडळ उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात

वरोरा
चेतन लुतडे 

वरोरा शहरातील मालवीय वार्डात राहणाऱ्या वांढरे कुटुंबातील लहान मुलाचा दूषित पाणी प्याल्याने मृत्यू झाला होता. या घटनेला पंधरा दिवस उलटून सुद्धा न्याय मिळाला नसल्याची खंत स्थानीय सामाजिक कार्यकर्ता वैभव डहाने यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून लहान मुलाला न्याय न मिळाल्यामुळे आज शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून वैभव डहाणे यांनी तहसील कार्यालयातील टॉवरवर चढून प्रशासकीय यंत्रणेचा निषेध नोंदवत आंदोलन सुरू केले आहे.


वरोरा नगरपालिका तर्फे विदर्भ मल्टी सर्विसेस कंपनीला पाणीपुरवठा करण्यासाठी कंत्राट दिली असून हेच कंत्राट वाढीव भावाने पुन्हा दिल्याने जनसामान्याच्या खिशाला कात्री लावल्याची मत डहाणे यांनी व्यक्त केले. 

प्रशासनाने अशा कंपनीला काळ्या यादीत टाकून पूर्वेश वांढरे कुटुंबीयांना आर्थिक सहकार्य करण्याची भूमिका घेत वरोरा शहरातील तहसील कार्यालयातील टॉवरवर चढून लक्षणीय आंदोलन सुरू केले आहे.

या प्रकरणात गेल्या पाच-सहा तासापासून हे आंदोलन सुरू आहे मात्र अजून पर्यंत कोणताही तोडगा निघू शकला नाही. 
वैभव ढहाने यांनी त्वरित कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली असून पांढरे परिवारांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी या संबंधात मागणी करण्यात आली होती.
त्यामुळे आंदोलकांनी वरोरा शहरातील आतील रोडवर बसून आंदोलन तीव्र केले.
सहा वाजताच्या दरम्यान वैभव डहाणे यांच्या साठी शिवसेना उ.बा.ठा. जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे आणि विधानसभा प्रमुख मुकेश जीवतोड  शिष्टमंडळ तयार करून तोडगा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांच्या कार्यालयात चर्चा घडवून आणली. 

मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी मान्य केले की वरोरा येथील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन ही फार जुनी असल्याने 22 सालातच कालबाह्य झालेली आहे. 

वरोरा शहराला 40% लोकांपुरतेच पिण्यायोग्य पाणी पुरवल्या जाते.
याही पहिले अशा घटना वरोरा शहरात घडल्या होत्या. 

उपविभागीय पोलीस अधिकारी नवमी साठम खाली उतरणार नाही तोपर्यंत चर्चा घडवून येणार नाही. 



Comments