वरोडा : श्याम ठेंगडी
महाराष्ट्राचे माजी मंत्री व सहकार महर्षी स्वर्गीय संजय देवतळे यांचे पुत्र व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव करण संजय देवतळे यांचा ८ जुलै रोज सोमवारला वाढदिवस सोहळा येथील कटारिया मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते तसेच वरोडा ,भद्रावती तालुक्यातील स्वर्गीय संजय देवतळे यांच्यावर प्रेम करणारा चाहता वर्ग तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
सकाळी आठ वाजता शहरातील प्रमुख ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच दुपारी बारा वाजता कटारिया मंगल कार्यालय येथे गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व दिव्यांगाना तीन चाकी सायकल वितरण कार्यक्रम पार पडणार आहेत.
त्याचप्रमाणे सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत अभिष्टचिंतन सोहळा सुरु रहाणार आहे. तसेच सायंकाळी सुभाष वार्डातील दुर्गा माता मंदिरात सायंकाळी ७ वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवतळे मित्र परिवाराकडून करण्यात आले.
Comments
Post a Comment