स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टव्दारा शैक्षणिक दत्तक पाल्यांना शालेय साहित्य वितरीत**शैक्षणिक दत्तक 86 पाल्यांना अभ्यासक्रमातील पाठपुस्तके, शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेशाचे वितरण*
*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टव्दारा शैक्षणिक दत्तक पाल्यांना शालेय साहित्य वितरीत*
*शैक्षणिक दत्तक 86 पाल्यांना अभ्यासक्रमातील पाठपुस्तके, शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेशाचे वितरण*
*”स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना” अंतर्गत कार्यक्रम संपन्न*
वरोरा
चेतन लुतडे
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे उपक्रम अभियान स्व. सिंधुताई सपकाळा शैक्षणिक पाल्य दत्तक योजना अंतर्गत ट्रस्टनी शैक्षणिक दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पाठपुस्तके, शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश वितरीत करण्यात आले. ”स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना”* अंतर्गत शिक्षणाकरीता दत्तक घेतलेल्या 86 पाल्यांना अभ्याक्रमातील पाठयपुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश आदी वितरण करण्यात आले.
ट्रस्टकडे एकुण 97 विद्यार्थी शैक्षणिक दत्तक घेण्यात आले आहेत. नर्सरी, एलकेजी, पहिली ते पदवी अभ्याक्रमाकरीता ट्रस्टकडे आजपावेतो शैक्षणिक सत्र 2024-25 पर्यंत एकुण 86 विद्यार्थी शैक्षणिक दत्तक असून 11 विद्यार्थी शैक्षिणिक दत्तक प्रक्रीयेत आहेत.
ट्रस्ट स्थापन झाल्यापासून संस्थापक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम तसेच अभियान राबवीण्यात येत आहेत. प्रामुख्याने एकुण आठ योजना ट्रस्टच्या माध्यमातून राबवील्या जात आहेत. यापैकी एक उपक्रम म्हणजे स्व. सिंधुताई सपकाळा शैक्षणिक पाल्य दत्तक योजना. गरीब गरजू, मातृपितृ छत्र हरविलेली, अनाथ, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेवून त्यांचे संपूर्ण शिक्षण पुर्ण करण्यास मदत करीत असते.
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीय ट्रस्ट चंद्रपूर व्दारा चालविण्यात येत असलेले उपक्रम अभियान वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिका योजना, विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन सामाजिक उपक्रम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदे विषयक मार्गदर्शन उपक्रम, श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान, हिंदुहृद्य वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना, डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना, अनाथांची माई स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना तसेच कै. म ना पावडे क्रिडा स्पर्धा या योजनांचा लाभ घेण्याचे संस्थापक रविंद्र शिंदे यांनी समाजातील समाजातील दिन-दुबळे, गरीब-गरजू, पिडीत-शोषीत, शेकरी-शेतमजुर, निराधार, दिव्यांग, महिला, विद्यार्थी, गंभीर आजारी रुग्ण यांना आवाहन केले आहे.
संस्थापक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले शैक्षणिक साहित्य वितरणप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, कोषाध्यक्षा सुषमाताई शिंदे, दत्तक पाल्य, त्यांचे पालक आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment