चंद्रपूर, दि. 11 : राज्यात उद्योग व उद्यमशीलता विकासासाठी राज्य शासनाच्या उद्योग संचालनालय, मुंबई च्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत आहेत. सदर योजनांचा लाभ अधिकाधिक उद्योजकांना मिळणे तसेच उद्योगांमध्ये गुंतवणूक, वृध्दी, निर्यात व ‘एक जिल्हा एक उत्पादन’ यावर (ODOP) सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रमावर आधारित 15 जुलै रोजी ‘इग्नाईट महाराष्ट्र’ यावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 जुलै रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 पर्यंत नियोजन भवन, चंद्रपूर येथे सदर कार्यक्रम होणार आहे. उद्योग विभागतर्फे एम.एस.एम.ई क्षेत्रावर भर देवून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात निमार्ण करणे, तसेच एक जिल्हा एक उत्पादन (ODOP)उपक्रम व निर्यात वृध्दीस चालना देण्यासाठी तसेच उद्योग विकासाठी राज्य व केंद्र शासनाचे विविध विभाग, त्यांचे उपक्रम व योजना राबवित आहेत. त्यादृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेस सुक्ष्म, लघु, मध्यम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक समूह, औद्योगीक संस्था व संघटना,औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग विभागाने केले आहे.
००००००
Comments
Post a Comment