वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा पेट्रोल पंप सुरू होणार !भारत पेट्रोलियम कंपनीकडून मंजुरी प्रदान

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा पेट्रोल पंप सुरू होणार !
भारत पेट्रोलियम कंपनीकडून मंजुरी प्रदान 

वरोरा तालुका प्रतिनिधी-  बाळूभाऊ भोयर

केंद्र शासनाच्या सहकार धोरणानुसार शासनाने काही बाजार समितीला उत्पादनाचे साधन कायमस्वरूपी उपलब्ध व्हावे याकरिता शासनाच्या निर्देशानुसार वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती करिता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भारत पेट्रोलियम कंपनीने पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजी व चार्जिंग सेंटर मंजूर केले असून त्याबाबतचे मंजुरी पत्र प्रादेशिक प्रबंधक एम.शिवप्रसाद रेड्डी यांनी बाजार समितीला मंजूरीपत्र प्रदान केले आहे.
    कृषी उत्पन्न बाजार समितीला भविष्यात कायमस्वरूपी उत्पादनाचे साधन उपलब्ध व्हावे व त्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना अधिकच्या सोयीसवलती तसेच सुविधा निर्माण करून देण्यासाठी बाजार समिती वरोरा यांनी भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड यांच्याकडे पेट्रोल पंप मिळण्याकरता अर्ज केला होता, सदर अर्जानुसार अवघ्या दोन महिन्यात कंपनीने बाजार समितीला पेट्रोल पंप मंजुरी प्रदान केली. सदर पेट्रोल पंप हा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयालगत असलेल्या खाली जागेत सुरू होणार असून शहरातील हे दुसरे पेट्रोल पंप ठरणार आहे. सध्या स्थितीत शहरातील पेट्रोल डिझेल ग्राहकांची गरज लक्षात घेता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी दुसऱ्या पेट्रोल पंपाची आवश्यकता होती, ती गरज मात्र काही महिन्यात पूर्ण होणार आहे.
       पेट्रोल पंप निर्माण व्हावे व बाजार समितीचे विविध प्रकल्प सुरू करण्यात यावी याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन तो ठराव शासनाला पाठविला होता त्यानुसार   शासनाने पेट्रोल पंप मंजुर केले असून त्याच बरोबर पणन  मंडळाने भव्य  शेतकरी भवन निर्माण करण्यासाठी मंजूरी प्राप्त झाली आहे.याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. विजय देवतळे, उपसभापती जयंत टेंमुर्डे, संचालक प्रवीणभाऊ मालू , बाळूभाऊ भोयर,दत्ता बोरेकर, राजेंद्र चिकटे, विलास झिले,अभिजीत पावडे, दिनेश कष्टी ,पुरुषोत्तम पावडे, नितीन मते, राजेश देवतळे, गणेश चवले, हरीदास जाधव, निरजबाबू गोठी ,पांडुरंग झाडे, कल्पनाताई टोंगे,संगीताताई उरकांडे व सचिव चंद्रसेन शिंदे यांचे  सहकार्य लाभले. तसेच  कृषी उत्पन्न बाजार समितीला पेट्रोल पंप ची मंजुरी मिळाल्याबद्दल अधिकारी  जिल्हा निबंधक प्रशांत धोटे, सहायक निबंधक संधु मॅडम व शेतकऱ्यांनी तसेच शहरातील  नागरिकांनी सुद्धा बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या कार्याचे कौतुक  व अभिनंदन केले आहे.

Comments