खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

आनंदवन प्रकरणातील आरोपीची पोलीस कस्टडीत आत्महत्या.

Breaking... 
आनंदवन प्रकरणातील आरोपीची पोलीस कस्टडीत आत्महत्या.

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील आनंदवन येथिल 24 वर्षीय तरुणीच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या समाधान माळी (25) या आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 
वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्येच आज सकाळी 8:30 च्या दरम्यान बुटाच्या लेस ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे , आरोपी 4 जुलै पर्यंत 7 दिवसांच्या  पोलीस कोठडीत होता. आरती चंद्रवंशी या तरुणीचा बुधवारी घरात शिरून आरोपीने हत्या केला होता . प्रेमप्रकरणातील अविश्वासातून हा खून झाल्याचा संशय होता. खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी समाधान गुरुवारी संध्याकाळी अटक केली होती. आरोपीने लॉकअप मध्ये बाथरूमच्या दरवाज्याला आत्महत्या केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सह वरोरा तहसीलदार देखील प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.

 या आत्महत्या प्रकरणातील बरेच प्रश्न अनुत्तरीत असून या घटनेचा तपास पुढील यंत्रणा  करीत आहे.

अजून पर्यंत अधिकृतरित्या पत्रकारांना माहिती मिळाली नसून शव विच्छेदनासाठी वरोरा किंवा चंद्रपूर रुग्णालयात शेव नेण्यात येणार असल्याचे कळले.






Comments