*पती सासू-सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल*

*पती सासू-सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल*

वरोरा 
चेतन लुतडे 
                 शेगाव येथील आत्महत्या केलेल्या पल्लवी मितेश पारोधे या विवाहितेची आई उमा विनोद ढोके यांनी शेगाव पोलीस स्टेशन येथे मुलीचा पती मितेश किशोर पारोधे, सासरे किशोर पारोधे, सासू सीमा पारोधे व दीर रितेश पारोधे यांच्या विरोधात आज 29 जूनला तक्रार दाखल केली आहे. 
   तिने मुलीचे पती, सासरे, सासू व दीर मिळून मुलीला सतत शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक मानसिक त्रास देत व माहेरून पाच लाख रुपये आणून दे असा तगादा लावलेला होता अशी तक्रार दाखल केली आहे.
        शारीरिक  व मानसिक त्रास दिल्याने आपल्या मुलीने त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे मार्गदर्शनात शेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्र सिंग यादव हे चौकशी करीत आहेत.


Comments