*रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर भद्रावती महसूल विभागाची कारवाई*

*रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर भद्रावती महसूल विभागाची कारवाई*
 
अतुल कोल्हे भद्रावती :-
                तालुक्यातील चारगाव नदी अहेरी घाटातून ट्रॅक्टर द्वारे अवैधपणे रेतीचा भरणा करीत असतांना भद्रावती महसूल विभागाने कारवाई करीत जप्त केलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केला आहे. 
               सदर कारवाई भद्रावती तहसील कार्यालयाच्या गौण खनिज पथकाव्दारे  दि. 2 रोज रविवार सकाळी करण्यात आली. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. तालुक्यातील चारगाव अहेरी घाट   परिसरातील एका नाल्यात हे  ट्रॅक्टर अवैधपणे रेतीचा भरणा करीत होते. दरम्यान भद्रावती महसूल विभागाचे गौण खनिज पथक यांना गुप्त माहिती मिळाली असता ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर गौण खनिज पथकाने अहेरी घाटातून अवैद्य रेती भरून येत असणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करीत ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34 टीसी 165 ट्रॉली क्रमांक नसलेल्या ट्रॅक्टरला ताब्यात घेतले व  ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केले. विजासन  येथील बाळू  झोडे  यांच्या मालकीचे सदर ट्रॅक्टर असल्याचे महसूल विभागाद्वारे सांगण्यात आले. सध्या तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी होत असल्यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. यावर अंकुश लावण्यासाठी महसूल विभागाचे गौण खनिज पथक दिवस-रात्र या प्रकारावर लक्ष ठेवून कारवाई करीत आहे. सदर कारवाई तहसीलदार अनिकेत सोनवणे, तलाठी खुशाल  मस्के, तलाठीपरेश मैदमवार व गौण कर्मचाऱ्यांनी केली. घटनेची पुढील कारवाई महसूल विभागातर्फे सुरू आहे.

Comments