चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन ट्रॅप; चार लाचखोर जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चिमूर व चंद्रपुरात कारवाई

चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन ट्रॅप; चार लाचखोर जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चिमूर व चंद्रपुरात कारवाई

चंद्रपूर 
अंकुश अवथे 

चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी चिमूर व चंद्रपूर येथे कारवाई करून चार लाचखोरांना अटक केली आहे. यात चिमूर पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंता मिलिंद मधुकर वाढई (२७), आशिष कुशाब पेंदाम (२८, रा. देवरी) तर चंद्रपूर येथील कारवाईत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ सहायक अशोक बाबुरावजी बगुलकर (५८) रा. चंद्रपूर, वरिष्ठ लिपिक दीपक केशवराव सज्जनवार यांचा समावेश आहे.

Comments