*हिंद महामिनरल्स कंपनीवर गुन्हा दाखल करा**काँग्रेस प्रदेश सचिव विजय नडे यांची सीआयडी चौकशीची मागणी*

*हिंद महामिनरल्स कंपनीवर गुन्हा दाखल करा*

*काँग्रेस प्रदेश सचिव विजय नडे यांची सीआयडी चौकशीची मागणी*
अतुल कोल्हे भद्रावती :-
                      दि. 17 जून रोजी चंद्रपूरचे एचडीपीओ यादव यांनी स्पांज आयर्न च्या बॅड मटेरियलने भरलेला ट्रक पकडला हा ट्रक सनविजय पॉवर मधून हिंद महामिनरल्स म्हणजेच गुप्ता कोल वॉशरिज मध्ये जात होता हे प्रकरण दिसायला साधे सोपे असले तरी या पाठीशी राज्याचा अब्जावधीचां महाघोटाळा असल्याचे सांगत प्रदेश काँग्रेस सचिव विजय नळे यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून हिंद महामिनरल विरोधात एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली आहे राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना पाठवलेल्या निवेदनात नळे यांनी म्हटले आहे की, कोल वॉशरीज कडून राख, माती आणि स्पंज आयरन चे वेस्ट मटेरियल मिसळून अत्यंत खालच्या दर्जाचा कोळसा महाजन कोचा ऊर्जा प्रकल्पांना पुरवला जात आहे जेव्हा की कॉल इंडिया अंतर्गत वेकोलीच्या खाणी कडून चांगल्या दर्जाचा कोळसा वॉशरीजला दिला जातो मात्र यातून चांगला कोळसा खुल्या बाजारात विकून भेसळ कोळसा ऊर्जा प्रकल्पांना देण्याचे मोठे षडयंत्र गेल्या चार वर्षापासून सुरू आहे हिंद महामिनरल करिता जाणारा हा ट्रक पकडण्याची घटना हे या महाघोटाळ्यातील एक छोटासा अध्याय मात्र आहे त्यामुळे जिल्हा पोलिसांनी जर या प्रकरणाचे सखोल सीआयडी चौकशी केली तर जिल्हा पोलिसांना राज्याचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा उघड करण्याचे ऐतिहासिक यश मिळेल असा दावा काँग्रेस नेते विजय नळे यांनी आपल्या निवेदनातून केला आहे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि एमपीसीबी ला दिलेल्या निवेदनात काँग्रेस प्रदेश सचिव नळे यांनी हिंदू महामंडळ विरोधात एफ आय आर दाखल करण्याची आग्रही मागणी केली आहे.

*विधानसभेत गाजणार मुद्दा*
हे प्रकरण दिसायला सोपे असले तरी यात अनेक मोठे मासे गवले गेले आहेत त्यामुळे हे प्रकरण विधानसभेच्या आगामी अधिवेशनात घेऊन जाण्याचा मानस नळे यांनी व्यक्त केला आहे या संदर्भात आपले बोलणे झाले असून लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा विधानसभेत गाजेल असा दावा सुद्धा काँग्रेस राज्य सचिव विजय नळे यांनी केला आहे.

Comments