वरोरामध्ये काँग्रेसला नवा जोम: खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश*

*वरोरामध्ये काँग्रेसला नवा जोम: खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश*

**वरोरा**: आज चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चेतन शर्मा आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (अनु. जा.) सचिव अमर गोंडाने यांच्या नेतृत्वाखाली भाजपा वरोरा शहरातील पदाधिकारी आणि अनेक प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या कार्यक्रमात राहुलभाऊ आत्राम, माजी शहर अध्यक्ष, भाजपा कामगार मोर्चा वरोरा; योगेशभाऊ खोब्रागडे, अध्यक्ष जय भीम सेना वरोरा; अभिजीत चौधरी, मयूर उमाटे, जितेश चौधरी, हाशिमभाई अली, राजीब पठाण, तुषारभाऊ मर्दाने, प्रवीण राहुलकर, महेंद्र धुर्वे, विशाल भोयर, सचिन दारुंडे, आणि लोकेश खोब्रागडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सर्व नवीन सदस्यांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना काँग्रेस पक्षाच्या उद्दिष्टांशी ओळख करून दिली. त्यांनी आश्वासन दिले की, "हे नवीन सदस्य आपल्या अनुभव आणि कर्तृत्वाने काँग्रेस पक्षाला अधिक मजबूत करतील आणि समाजाच्या हितासाठी कार्य करतील."

युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चेतन शर्मा यांनीही नवीन सदस्यांना शुभेच्छा दिल्या आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी त्यांना प्रेरित केले. अमर गोंडाने यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा मिळेल आणि आगामी निवडणुकांमध्ये यश मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.

---

Comments