कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हातमाणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हात माणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ बातमी: चंद्रपूर : सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर तर्फे कॅन्सरशी झुंज देणाऱ्या १० वर्षीय कुमारी रोही सिंह हिला मदतीचा हात देण्यात आला आहे. ‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत ही मदत करण्यात आली असून, तिच्या उपचारांसाठी महत्त्वाचे सहकार्य मिळाले आहे. मुळचे उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील नागेंद्र सिंह हे सध्या नागपूर येथे उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहेत. त्यांची अल्पवयीन मुलगी रोही सिंह हिला हाडांचा कॅन्सर (Bone Cancer) झाला असून, या गंभीर आजारामुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अशा कठीण परिस्थितीत ट्रस्टने पुढाकार घेत तिच्या उपचारांसाठी आर्थिक तसेच नैतिक आधार दिला आहे. या उपक्रमातून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर एका निरागस मुलीला नव्याने जगण्याची आशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रोही ही या आजारावर मात करून पुन्हा आनंदाने जीवन...

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर द्वारा विद्यार्थिनीला आर्थिक मदत**ट्रस्टतर्फे सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा लाभ घ्यावा : रविंद्र शिंदे*

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर द्वारा विद्यार्थिनीला आर्थिक मदत*

*ट्रस्टतर्फे सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा लाभ घ्यावा : रविंद्र शिंदे*

भद्रावती : स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर तर्फे 'एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना' अंतर्गत तालुक्यातील चालबर्डी (रै.) येथील एका विद्यार्थिनीला शिक्षणाकरिता आर्थिक सहकार्य करण्यात आले.
              भद्रावती तालुक्यातील चालबर्डी (रै.) येथील सौ. संध्या प्रदीप राऊत या भूमिहीन असून मोलमजुरी करतात. यांची मुलगी कु. कन्यका प्रदीप राऊत बारावी उत्तीर्ण झाली आहे. पुढील शिक्षण घेवून तिला पीएसआय बनायचे आहे, त्याकरीता नाशिक येथील अश्वमेध करीयर अकॅडमी येथे प्रवेश घेवून प्रशिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज असल्याचे पत्र आई सौ. संध्या प्रदीप राऊत यांनी ट्रस्टला दिले. त्यानुसार कु. कन्यका प्रदीप राऊत हिला प्रशिक्षणाकरीता आज (दि. ११) ला रविंद्र शिंदे यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.
        राऊत कुटुंबाची जेमतेम परिस्थिती असल्याने त्याला पुढील शिक्षणाकरीता आर्थिक सहकार्य हवे होते. सौ. संध्या प्रदीप राऊत यांना स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या योजनांविषयी माहिती झाली. त्यांनी ट्रस्ट कडे मदतीची मागणी केली व ट्रस्टने कसलाही विलंब न लावता त्याला आर्थिक सहकार्य केले. 
                यावेळी ट्रस्टचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे, कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, सदस्या सुषमाताई शिंदे, संजय तोगट्टीवार उपस्थित होते.
                'एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना' अंतर्गत यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे.
            ट्रस्ट तर्फे विविध समाज उपयोगी अभियान राबविल्या जात असून गरजूंनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे म्हणाले.

Comments