*भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीच्या युवा विदर्भ अध्यक्षपदी डॉक्टर मुखर्जी यांची नियुक्ती*

*भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीच्या युवा विदर्भ अध्यक्षपदी डॉक्टर मुखर्जी यांची नियुक्ती*
 
अतुल कोल्हे भद्रावती :-
 भद्रावती येथील सुप्रसिद्ध बिल्डर डॉ. विश्वजीत पंकज मुखर्जी यांची भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीच्या युवा विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पार्टीचे राष्ट्रीय प्रभारी तपन कुमार राय यांनी डॉक्टर विश्वजीत मुखर्जी यांना एक नियुक्तीपत्र सादर करून ही नियुक्ती केली. डॉक्टर विश्वजीत मुखर्जी हे व्यवसायाने बिल्डर असून त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. या माध्यमातून आपण सामाजिक कार्य करू असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांच्या या नियुक्तीमुळे विदर्भात भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीच्या कार्याला वेग प्राप्त होऊन सामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचे उद्दिष्ट साध्य होईल असा विश्वास यावेळी पार्टीचे राष्ट्रीय प्रभारी तपन कुमार राय यांनी व्यक्त केला. डॉक्टर मुखर्जी यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे परिसरात तथा शहरात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

Comments