भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा**७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*

*७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 

भद्रावती = अक्षय तृतीयेच्या पावन पर्वावर दि. १० मे रोज शुक्रवार रोजी स्थानिक श्री मंगल कार्यालयात   स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने तसेच विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्या  सहभागातून  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व  सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला.
   यानिमित्य आज शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजता  शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज आणि भांदेवाडाचे जगन्नाथ महाराज यांच्या पादुकांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत भद्रावती व वरोरा तालुक्यातील ७१  पुरुष - महिलांच्या  भजनी दिंडयासह हजारो भाविकांनी सहभाग घेतला. तसेच परमपुज्य भागवतमनीषी संत श्री मनीष भाईजी महाराज ,कायर पिपरी येथील पावडे महाराज, माजरी येथील सुनील महाराज शास्त्री, हरणघाट येथील मुर्लीधर महाराज, चंद्रपूर येथील मधुबाबा, वढा येथील चैतन्य महाराज, भद्रावतीचे निरंकारी सत्संगचे किसन माटे महाराज आदी संत मंडळी सुध्दा या शोभायात्रेत सहभागी झाले.
सदर शोभायात्रा श्री रविंद्र शिंदे यांच्या निवास स्थानापासून सुरू झाली. ही शोभायात्रा   विठ्ठल मंदिर - गांधी चौक -जामा मस्जीद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - संत झिंगुजी महाराज मठ या मार्गाने श्रीमंगल कार्यालयालयात पोहचली.

Comments