निमढेला गेट येथील हजारे वाघाची गोरेवाडा झू येथे रवानगी.निमढेला पर्यटन गेट अनिश्चित कालावधीसाठी बंद.

निमढेला गेट येथील  हजारे वाघाची गोरेवाडा झू येथे रवानगी.

निमढेला पर्यटन गेट अनिश्चित कालावधीसाठी बंद.

वरोरा 18/5/24
चेतन लुतडे 

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील निमढेला गेट येथील हजारे वाघाची गोरेवाडा झू येथे रवानगी करण्यात आली आहे. 
मागील काही दिवसापूर्वी खानगाव परिसरातील एका शेतकऱ्याची शिकार केली होती. यानंतर गावातील लोकांनी उद्रेक करत जंगलाला कंपाऊंड करा अन्यथा निमढेला गेट बंद करा .अशी भूमिका घेतल्याने. वन विभागाने अनिश्चित कालासाठी नेमढेला गेट बंद करण्यात आले आहे. खानगाव येथील लोकांच्या या भूमिकेमुळे निमढेला गेटमधून जाणारे पर्यटक आता नवेगाव गेटमधून सोडण्यात येत आहे. जवळपास रोज वीस गाड्या या गेटमधून पर्यटनासाठी सोडल्या जात होत्या. याचबरोबर रामदेगी परिसरात या जिप्सीचा थांबा सुद्धा बंद करण्यात आला आहे. यामुळे तेथील दुकानदारावर उपासमारीची वेळ आली आहे.