वरोडा : शाम ठेंगडी वरोरा
येथील श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे
राम मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीचा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांचा निजानंद दिन (पुण्य तिथी) कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील चैत्र कृ. १३ दिनांक ६ मे रोज सोमवार ला प्रगट रुपात संपन्न झाला.
सकाळी ७.३० वाजता पासून धार्मिक कार्यक्रमाला प्रारंभ झाला असून सकाळी भूपाळीनंतर सर्व सेवेकरी यांचे सहभागाने श्री स्वामी समर्थ महाराज यांचा महा अभिषेक करण्यात आला. यात जवळपास 15 जोडपे सहभागी झाले होते. यानंतर शहरातील उद्योजक आशिष ठाकरे व कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब भोयर यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती पार पडली. त्यानंतर श्रीराम सत्संग महिला भजन मंडळाच्या महिला सदस्यांचे भजन झाले.
यानंतर दुपारी १२:०० वाजता अनेकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. सायंकाळी ६.३० वाजता श्रीराम देवस्थान कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीकांत पाटील यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले व शहरातील मार्गावरून पालखीची परिक्रमा काढण्यात आली. रात्रौ ९:०० वाजता श्री स्वामींची महा आरती करण्यात आली. सम्पूर्ण कार्यक्रमात शहरातील अनेक भाविक भक्त बहुसंख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अध्यक्ष बाबा वाकडे व सचिव संदीप ठाकरे जगदीश तोटावर यांच्या नेतृत्वात अनेक सेविक-यांनी परिश्रम घेतले .
Comments
Post a Comment