पोलिसांना चोराचे आव्हान ,न्यायाधीशांच्याच घरात चोरी वरोरा पोलिसांचा कसून तपास सुरू.

पोलिसांना चोराचे आव्हान ,न्यायाधीशांच्याच घरात चोरी 

वरोरा पोलिसांचा कसून तपास सुरू.


वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून चोरांचा  सुळसुळाट सुरू झाला असून चोरांनी एक प्रकारे पोलिसांना आव्हानच केल्याचे दिसत आहे. 
वरोरा येथे सिविल सीनियर डिव्हिजन  न्यायाधीश दस्तगीर पठाण हे ओम शांती वार्ड देशपांडे पेट्रोल पंप च्या पाठीमागे गेल्या काही कालावधीपासून किरायाने राहत आहे. ते वरोरा येथील न्यायालयात न्याय देण्याचे काम करीत आहे. गावाकडे काही काम असल्याने मागील रविवार पासून सुट्टी घेऊन पठाणसाहेब आपल्या गावी गेले होते. या दरम्यान 23 तारखेला रात्री अज्ञात इसमानी घराचे लॉक तोडून घरामधील 12 तोळे सोने, चार सोन्याच्या  बदामी टॉप अंगठी, 100 ग्रॅम चांदी वाटी व पैजन , दहा हजार रुपये रोख रक्कम , सौदी अरब देशाची रियाद करन्सी असा मुद्देमाल चोरांनी चोरून नेला आहे.

या संबंधात फिर्यादी प्रदीप चंद्रकांत पूसदकर यांनी तक्रार नोंदवली असून या संबंधात झालेली सगळी घटना न्यायाधीश पठाण यांना व्हिडिओ कॉलिंग दरम्यान समजावून सांगितली. 


पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून डॉग स्कॉड ला पाचारण करण्यात आले होते. यावेळी श्वान  देशपांडे पेट्रोल पंप पर्यंत जाऊन थांबल्याने सध्या पोलिसांचा तपास संपुष्टात आला. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत त्याच ठिकानी चोरांनी शहरात टार्गेट बनविले आहेत. विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून अजून पर्यंत ठोस पुरावे पोलिसांच्या हातात लागले नाहीत. यावेळी अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय जांभुळे व त्यांची टीम पोलीस तपास करीत आहे. शहरात अनोळखी व्यक्ती आल्यास त्याबद्दलची माहिती पोलीस स्टेशनला कळवावी अशी सूचना ठाणेदार अमोल काचोरे यांनी केली आहे.

वरोरा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असताना सुद्धा न्यायाधीशाच्या घरात चोरी होणे हे पोलिसांना एक प्रकारे आव्हानच आहे. वरोरा शहरात पोलिसांचा दबदबा राहलाच नाही अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे.


Comments