अतुल कोल्हे भद्रावती
तालुक्यातील छत्रपती मर्दानी खेळ काटवल (तुकुम) या संघाच्या माध्यमातुन दिनांक ६ मे ते ३० मे २०२४ पर्यंत शिवकालीन मर्दानी खेळाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरी या खेळात लाठी काठी, तलवार बाजी, ज्यूडो कराटे अशा खेळांचा समावेश आहे.
या कार्यक्रच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शामरावजी श्रीरामे, गौरव राणे व प्रशिक्षक म्हणून करण नेवारे, युगल राखुंडे व कोच म्हणून रोहित श्रीरामे उपस्थित होते.
या शिबिरात एकूण २५ विद्यार्थ्यांणी भाग घेतला आहे, त्यापैकी केतन श्रीरामे, विराज सोनुले, संचित मानकर, किरण चौधरी, सोहम लोहटकर, सेजल मानकर, कस्तुरी श्रीरामे, समीक्षा नेवारे, नंदिनी नेवारे, कांचन चौधरी, समीक्षा श्रीरामे, आरुषी लोहटकर, वैभवी भोयर, वैष्णवी धारणे आणि आठ वर्षाची विद्यार्थिनी आरोही श्रीरामे, तन्वी गौरकार व खुशी करडेकर असे एकूण २५ विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रशिक्षणाचा लाभ घेत आहे.
या खेळाचे महत्त्व असे की मर्दानी खेळ हे आज काळाची गरज, एक प्राचीन मर्दानी , छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत असलेला हा मोहक खेळ एक व्यायामसाधना स्वसंरक्षण व शत्रूवर हल्ला करणे या मूलभूत गरजातून लाठी फिरवण्याच्या कल्पनेचा उगम झाला. स्वतःचे शौर्य दाखवण्याचे साधन म्हणून लाठीला महत्त्व आहे. प्रतिपक्षाशी जवळून झुंज द्यायची असेल तर ती कुस्तीने देता येते. तथापि दुरून हल्ला चढविण्याच्या कामी लाठीच उपयोगी पडते. प्राचीन काळात बचाव व हल्ला यांसाठी सुरूवातीला झाडाच्या फांदीचा वापर होई, त्यातूनच पुढे काठीचा वापर रूढ झाला. काठीचेच रूपांतर पुढे लाठीत झाले. ‘लठ’ म्हणजे लांब लाठी. लठ जाडा, वजनदार व डोक्यापेक्षा एक हात उंच असतो. लाठीची उंची सु. ५ ते ५ -१/२) फुट (१·५२ ते १·६७ मी.) असते. ती साधारण कानाच्या पाळीपर्यत उंच असावी. अशा प्रकारे लाठी काठी व इत्यादी खेळ छत्रपती मर्दानी खेळ काटवल (तुकुम) यांच्या शिबिरात शिकविले जात असून हे कौशल्य पुढच्या पिढीपर्यंत पोचावे आणि त्याचे संवर्धन व्हावे यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
Aniket bhoyar
ReplyDelete9322349370
ReplyDelete