जिवंत विद्युत ताराच्या स्पर्शाने गायीचा मृत्यू*

*जिवंत विद्युत ताराच्या स्पर्शाने गायीचा मृत्यू*

अतुल कोल्हे भात्रावती : 
                 तालुक्यातील आष्टी (तुकुम )शेत शिवारात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या खांबावरील तारा तुटून खाली पडल्याने जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने एका गाईचा मृत्यू झाला. सदर घटना दि.२५ मे रोजी सकाळी ८:३० वाजता गजानन काकडे यांचे शेतात घडली.
   आष्टी काकडे निवासी गुलाब बबन काकडे यांच्या मालकीची ही गाय असून त्यांनी सकाळी चराई साठी सोडली.आष्टी काकडे येथील गजानन काकडे यांचे शेतातून जात असताना आधीच तुटून पडलेल्या ११ केवी जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने गायीचा जागीच मृत्यू झाला.यात त्यांचे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले.या घटनेची तक्रार विद्युत विभागाला करण्यात आली.घटनेचा पंचनामा करून पशुधन विकास अधिकारी डॉ.विकास ताजने व डॉ.नन्नावरे यांनी गायीच्या प्रेताचे शव विच्छेदन केले.झालेल्या नुकसानीची मागणी गुलाब काकडे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाकडे केली आहे.

Comments