वाघाच्या हल्ल्यात खानगाव येथील शेतकरी ठार.

वाघाच्या हल्ल्यात खानगाव येथील शेतकरी ठार. 

वरोरा 
चेतन लुतडे 

चिमूर तालुक्यातील खानगाव गावामध्ये एका शेतकऱ्याची वाघाने शिकार केली असून गावामध्ये वाघाचे दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

ताडोबा वाघ प्रकल्पातील निमढेला या गेटवर वाघाची संख्या वाढल्याने आजूबाजूंच्या गावांमध्ये वाघाने प्रवेश केला असून याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. 
मंगळवारी रात्रीच्या दरम्यान खानगाव येथील शेतकरी आपल्या शेतामध्ये बैल बांधण्यासाठी गेला असता. दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकरी अंकुश श्रावण खोब्रागडे राहणार खामगाव या शेतकऱ्यांला जागीच ठार केले. यावेळी आजुबाजूला शेतात कोणीच नसल्यामुळे त्याला मदत करता आली नाही. यानंतर ही वार्ता गावामध्ये पसरल्यावर घटनास्थळी गावातील लोक जमा झाले. वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी येऊन पंचनामा करण्यात आला. यानंतर  शव उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आले असून पुढील कारवाई पोलीस व वनविभाग करीत आहे.

Comments