वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

मार्डा डॅम जवळ पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा दुर्दैवी अंत.* *अवैध वाळू उत्खनन करणारे खड्डे ठरले जीव घेणे.*

*मार्डा डॅम जवळ पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा दुर्दैवी अंत.* 

 *अवैध वाळू उत्खनन करणारे खड्डे ठरले जीव घेणे.* 

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा येथील रहिवाशी असलेल्या मानस राऊत  याचा वर्धा नदीपात्रात बुडून दुःखद निधन झाल्याची दुःखदाय घटना आज दुपारी घडली आहे.

यात्रा वार्ड यथील मानस व त्याचे दोन मित्र सकाळी हॉलीबॉल खेळण्यासाठी गेले होते. यानंतर त्यांनी मार्डा डॅम जवळील भागात पोहण्याचा बेत आखला  तिनही मित्र सायकलने मार्डा डॅम जवळील ,दांडगाव रोड नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. मानस व त्याचे मित्र वयाने लहान असून पोहणे सुद्धा बरोबर येत नव्हते. तीनही मित्रांनी पाण्यामध्ये उतरून पोहण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा अंदाज न आल्याने मानस खोल पाण्यामध्ये गेला. या ठिकाणी वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणात वाळूचे मोठेखड्डे तयार केले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने या खड्याचा अंदाज न आल्याने मानस अविनाश राऊत वय 13 वर्ष , पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. घाबरलेल्या अवस्थेत दोन्हीही मित्रांनी सायकल पकडून घरचा रस्ता पकडला.
 मित्रांनी हा सगळा प्रकार घरी येऊन सांगितला . त्यानंतर शोधा शोध सुरू झाली. मित्रपरिवार व आई वडील मानसच्या शोधात वर्धा नदीपात्रात येऊन पोहोचले. यानंतर वरोरा पोलीस व मारेगाव पोलीस यांना पाचारण करण्यात आले. यानंतर मृतदेह मालेगाव येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात  आला. मानसच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे ‌.
******************************************
भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचालिका व नदोरी ग्रामपचायत सरपच तथा शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे सघंटक मगेश भोयर  यादी गावकरी मडळी उपस्थित कार्यक्रम पार पडला.
**************************************

Comments