*कास्ट्राईब संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

*कास्ट्राईब संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

अतुल कोल्हे भद्रावती : 
             नुकत्याच जाहिर झालेल्या बारावीच्या निकालात प्रावीण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
     विज्ञान शाखेतील विद्यार्थीनी वैष्णवी विजय निवलकर हिने ८९.५०%  गुण घेत प्राविण्य प्राप्त केले. वाणिज्य शाखेतून सांची राजेंद्र गणवीर ८८% गुण घेत प्राविण्य मिळविले. तर विज्ञान शाखेतून वैष्णवी वासुदेव खाडे ह्या विद्यार्थिनीने ८१.३३ टक्के गुण मिळवत प्राविण्य प्राप्त केले आहे.
     कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ भद्रावतीच्या वतीने या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन पालकांसह सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण थेरकर, प्रेमदास तुमराम, प्रवीण रायपुरे, वसंता जांभुळे, हर्ष उराडे, अनिल भगत, विजू पाटील, हुमेन्द्र बोरकर, ताराचंद शेंडे, विजय निवलकर, वासुदेव खाडे सर उपस्थित होते. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करून भावी वाटचालीकरता शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments