*भद्रावतीत व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिराला सुरुवात**शिबिराचे तिसरे वर्ष : शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद*

*भद्रावतीत व्हॉलीबॉल प्रशिक्षण  शिबिराला सुरुवात*

*शिबिराचे तिसरे वर्ष : शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद*

अतुल कोल्हे भद्रवती :-
               शहरातील युथ स्पोर्टिंग  क्लब भद्रावती (B.Y. S. C) तर्फे तालुका क्रीडा संकुल भद्रावती येथे मुला - मुलींचे व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर 1 मे 2024 ते 20 मे 2024 पर्यंत रोज पहाटे 5.30 ते 8.00 वाजेपर्यंत व सायंकाळी 5.30 ते 8. 00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन नुकतेच पार पडले असुन या प्रसंगी भद्रावती युथ स्पोर्टिंग क्लब (B. Y. S. C) चे प्रवीण झाडे, स्वप्निल उमरे, योगेश गाडगे, गणेश काळे व क्लबचे खेळाडू यतीन दाते, वैभव दाते, पलास जयरामन, प्रतीक जयरामन, देवा झाडे, साहिल दोडके, ऋषभ नैताम, हर्षल चंद्रवंशी हे उपस्थित होते. 50 ते 60 प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षण शिबिरात सकाळी व सायंकाळी रोज प्रशिक्षण घेत आहे व शिबिराला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत असुन प्रशिक्षणार्थ्यांचा उस्फुर्त असा प्रतिसाद दिसत आहे.

Comments