*ओ.एफ. हायस्कूल चांदा मधील दहावीचा कविश मारबते शाळेतून सर्वप्रथम*

*ओ.एफ. हायस्कूल चांदा मधील दहावीचा कविश मारबते शाळेतून सर्वप्रथम*

अतुल कोल्हे भद्रावती :
                दहावी राज्य बोर्डाचा निकाल नुकताच जहिर झाला असुन भद्रावती येथील ऑर्डीनंस फॅक्टरी हायस्कूल चांदाने आपल्या ऊत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत दहाविचा शाळेचा निकाल यावर्षी १०० टक्के लागला आहे.सदर दहाविच्या परीक्षेत मुलां-मुलींनी बाजी मारली असुन शाळेतून पहिल्या चार यशस्वी विद्यार्थ्यांमधे तीन मुले तर एका मुलीचा समावेश आहे.शाळेतून कविश सुभाष मारबते या विद्यार्थ्याने ९४.६० टक्के गुण घेऊन सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.तर त्या पाठोपाठ मोहिनी खेडेकर हिने ९४.४० टक्के,कल्पक बोरीकर याने ९४.२० टक्के,शिवम बुराडकर याने ९४ टक्के घेऊन अव्वल आले आहे . याशिवाय सोबतच शाळेतील श्रुती आसुटकर हिने ९३.८० , वेदांत कांबळे याने ९३.४०, तनश्री पिंपळकर हिने ९० टक्के,अनुष्का माशिदकर हिने ८९.६०तर अथर्व कपाट या विद्यार्थ्यांने ८९.६० टक्के गुण प्राप्त करून शाळेतून प्रावीण्य प्राप्त केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य,मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाने अभिनंदन करुन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई, वडील व गुरुजनांना देते.

.                  कविश मारबते ९४.६० टक्के
********************************************

Comments