*काँग्रेस तर्फे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली*

*काँग्रेस तर्फे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली*

वरोरा /भद्रावती :-
                 भद्रावती शहर तथा तालुका काँग्रेस तर्फे शहरातील धानोरकर कार्यालयात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर,काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, काँग्रेसचे जिल्हा महासचिव धनंजय गुंडावर, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सरिता ताई सूर, माजी नगरसेवक प्रफुल चटकी, लक्ष्मण बोढाले, प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे, शोभाताई पारखी,प्रशांत झाडे, राष्ट्रवादीचे मुनाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले, तसेच शहरातील बंगाली कॅम्प येथील वृद्धाश्रमात भोजनदान देण्यात आले.
वरोरा येथे स्थानिक कार्यालयात दिवंगत खासदार बाळू भाऊ धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी काँग्रेस पक्षाचे विलास टिपले, गजानन मेश्राम, दिनेश चोखारे, डॉक्टर हेमंत खापणे, भाजप पक्षाचे डॉक्टर सागर वजे, 
बसंत सिंह, राजू चिकटे आदि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या आठवणींना उजाळा देत जनसामान्यांचा लोकनेता हरपल्याची खंत पहिल्या पुण्यस्मरण दिवशी व्यक्त करण्यात आले. धानोरकर परिवारांच्या पाठीशी लोकसभेतील सर्व जनता पाठीशी असल्याचे मत वसंत सिंग  यांनी  व्यक्त केले.
यानिमित्ताने लोकसभा क्षेत्रातील बहुसंख्या कार्यकर्ते हितचिंतक यावेळी उपस्थित होते.

Comments