वरोरा
चेतन लुतडे
20 मार्च 2024 झालेल्या आयपीएल च्या बातमी बाबत वृत्त प्रसारित करण्यात आले होते. Www.Purple9.com ही ऑनलाईन वेबसाईट लगेच बंद करण्यात आली होती.
त्याच्या म्होरक्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी काही दिवसापासून वरोरा शहरात क्रिकेट खेळावर सट्टा घेणाऱ्या मोरक्यांची फील्डिंग लावण्यात आली होती .यानंतर वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आपल्या नेतृत्वात एक टीम तयार करून क्रिकेटवर सट्टा खेळणारे दोन बूकीना रंगेहाथ पकडले आहे. संबंधित विभागाने अजून पर्यंत अधिकृत माहिती दिलेली नाही त्यामुळे नावे मिळू शकली नाही.
रविवारी पाच वाजताच्या दरम्यान राजस्थान रॉयल आणि चेन्नई सुपर किंग यादरम्यान सामना खेळल्या जात असताना. या दरम्यान पोलिसांनी सापळा रचून क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्या दोन युवकांना रंगेहात पकडल्याची बातमी वरोरा शहरात चर्चेस आली. मोबाईल सह इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले असून पुढील कारवाई पोलीस करिता आहे. पोलिसांची सट्टा किंग वर पहिलीच कारवाई आहे. मागील दहा वर्षापासून या धंद्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सट्टा किंग वर वरोरा शहरांमध्ये पोलिसांची नजर पहिल्यांदाच पडली आहे हे विशेष.
इतर सट्टा किंग बुकिंग चे नंबर नॉट रिचेबल झाले असून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या धाकाने
वरोरा शहरातील क्रिकेटवर सट्टा खेळण्यावर काही प्रमाणात आळा बसला आहे.
शहरातील बरेचसे युवक क्रिकेट जुगारात आपले सर्वस्व हरून बसले काही युवकांचे संसार उध्वस्त झालेले असताना वरोरा शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या रूपाने अशा सटृटा किंग माफियांवर कारवाई केल्याने चांगलीच चपराक बसली आहे. त्यामुळे पोलीस विभागाचे खास करून उपविभागीय पोलीस अधिकारी नवोमी साठम यांचे जनतेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
-------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment