बस स्थानक परिसरात युवकाचा मृतदेह आढळला**भद्रावती येथील घटना*

*बस स्थानक परिसरात युवकाचा मृतदेह आढळला*

*भद्रावती येथील घटना*

अतुल कोल्हे भद्रावती :-
          भद्रावती येथील बस स्थानक परिसरात एका 39 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. सदर घटना 26 रोज रविवारला सायंकाळी  बसस्थानक परिसरात उघडकीस आली. राजू भरणे व 39 वर्ष असे या मृतकाचे नाव असून हा युवक मद्यधुंद अवस्थेत पडून होता. त्यात उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचुन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Comments