*भद्रावती तालुक्यातील गुळगाव येथील घटना*
अतुल कोल्हे भद्रावती :-
दारू सोडण्याची औषध घेतल्याने अचानक तब्येत बिघडून दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. सदर घटना तालुक्यातील गुळगाव येथे घडली. याप्रकरणी भद्रावती पोलीस पुढील कारवाई करीत आहे. सहयोग सदाशिव जीवतोडे वय 19 वर्ष व प्रतीक घनश्याम दडमल वय 26 वर्ष राहणार गुळगाव अशी मृतकांची नावे असून सदाशिव पुंजाराम जीवतोडे वय 45 वर्ष व सोमेश्वर उद्धव वाकडे वय 35 वर्षे यांच्यावर उपचार सुरू आहे. सदर चारही व्यक्ती दिनांक 21 ला वर्धा जिल्ह्यातील शेडेगाव येथे एका वैद्याकडून दारू सोडण्याचे औषध घेऊन सायंकाळी आपल्या गावी परत आले. त्यानंतर या चौघांची ही अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना भद्रावती येथे उपचारासाठी आणल्यानंतर वरील दोघांचा मृत्यू झाला तर दोघांवर उपचार सुरू आहे. सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Comments
Post a Comment