वरोऱ्याच्या जाजू चौकातील घटना
वरोरा : एकोणा खाणीतील कोळसा वाहतुकीच्या स्पर्धेतून एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर शहरातील जाजू चौकात अडवून हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी जाकीर अयुब खान, आसिफ अयुब खान व विजय सिंग या तिघांवर वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, अटकही करण्यात आली आहे. वरोरा शहरातून होत असलेल्या कोळसा व्यवसायातील वाहतुकीतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
कोळसा व्यवसायाच्या स्पर्धेतून एकोणा कोलमाईन्स परिसरात यापूर्वी गोळीबारापर्यंतच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून, काही कोळसा वाहतूकदारांची दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भद्रावती तालुक्यातील माजरी कॉलरी येथील रूपचंद्र राजबहादूर यादव यांचेही एकोणा कोळसा खाणीत ट्रान्सपोर्टिंगचे काम आहे. त्यांच्या वाहनाने ठाकूर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून कोळसा वाहतूक केली जात असून, सध्या वर्धा जामणी येथील मानस ॲग्रो कंपनीला कोळसा पुरविण्याचे काम केले जात आहे. सोमवारी रूपचंद्र यादव स्वत:च्या दुचाकीने सकाळी १० वाजताच्या सुमारास एकोणा कोळसा खाणीमध्ये गेले होते. त्या ठिकाणाहून वरोरामार्गे माजरी येथे जाण्यासाठी निघाले असता वरोऱ्यातील जाजू चौकात दोन मोठी वाहने त्यांच्या दुचाकीला आडवी करून या प्रकरणातील आरोपी जाकीर अयुब खान, आसिफ अयुब खान व विजय सिंग खाली उतरले. बळजबरीने दुचाकीला आडवे होऊन शिवीगाळ करीत हल्ला करण्यात आला. तिघांनीही दांड्याने व हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
माजरी कॉलरी येथील फिर्यादी रामचंद्र यादव हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून, आरोपींचाही ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांचीही वाहने एकोणा कोलमाईन्समध्ये कोळसा वाहतुकीच्या कामात असल्याने व्यावसायिक स्पर्धेतून हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. वरोरा शहरातून एकोणा खाणीतील कोळसा वाहतुकीला बंदी असताना काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रात्रीच्या सुमारास शहरातून वाहतूक करतात. याबाबत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून एकमेकांची पोलिसांना माहिती दिली जाते. यातूनच हा जीवघेणा हल्ला झाल्याचा कयास बांधला जात असून, एकोणा कोळसा खाणीतील व्यावसायिक स्पर्धेतून यापूर्वी अनेक मारहाणीचे प्रकार घडले आहेत. गोळीबारापर्यंतही घटना पोहोचल्या असून, भविष्यात मोठे गँगवार होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपी जाकीर अयुब खान, आसिफ अयुब खान व विजय सिंग या तिघांविरुद्ध भादंवि कलम ३४१, २९४, ५०६, ३४, ३२४ अन्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेली वाहने पोलिसांनी जप्त केली असून, पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
Happy birthday Monubhau
महाराष्ट्रातील लोकप्रिय जेष्ठ नेते, माजी लोकसभा व राज्यसभा सदस्य, कामगार नेते श्री नरेशबाबु पुगलिया यांना ७७ व्या वाढदिवसानिमित्त श्रद्धेय बाबा आमटे आणि सेवाव्रती साधनाताई आमटे यांची प्रतिमा भेट देवून शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.
यावेळी भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास कोंगरे, सामाजिक कार्यकर्ते संजय बाबु उमरे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment